Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! सांगली राज्य उत्पादन शुल्कात महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का? मुजोर 'प्रवीण अण्णा'ची अरेरावी; वरिष्ठांकडूनही पीडितेचे तोंड दाबण्याचा संतापजनक प्रकार!​

सांगली दर्पण Exclusive! सांगली राज्य उत्पादन शुल्कात महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का? मुजोर 'प्रवीण अण्णा'ची अरेरावी; वरिष्ठांकडूनही पीडितेचे तोंड दाबण्याचा संतापजनक प्रकार!


सांगली :- शिस्त आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागात एका महिला कर्मचाऱ्याचा भयानक मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तालुक्याच्या कार्यालयात 'प्रवीण अण्णा' नामक व्यक्तीने महिला कर्मचाऱ्याला अत्यंत हीन दर्जाची वागणूक देत, 'अरेतुरे'ची भाषा वापरून तिचा जाहीर अपमान केला. विशेष म्हणजे, या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी गेलेल्या पीडितेची साधी दखल घेण्याऐवजी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच तिला गप्प राहण्यास फर्मावल्याने खळबळ उडाली आहे.

​नेमका प्रकार काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असताना संशयित प्रवीण अण्णा याने तिला गाठले. कोणत्याही कारणाशिवाय तिला एकेरी भाषेत संबोधित करत, तिच्या स्त्रीत्वाचा अवमान होईल अशा पद्धतीने अरेरावी केली. या अनपेक्षित प्रकारामुळे हादरलेल्या महिला कर्मचाऱ्याला कार्यालयातच रडू कोसळले.
​वरिष्ठांची भूमिका संशयास्पद!

​आपल्यासोबत झालेल्या या अपमानास्पद वागणुकीची तक्रार घेऊन ही महिला कर्मचारी जेव्हा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली, तेव्हा तिला न्याय मिळण्याऐवजी **'धक्कादायक अनुभवा'**ला सामोरे जावे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांनी संबंधित मुजोर व्यक्तीवर कारवाई करण्याचे सोडून, "विषय वाढवू नको," असे म्हणत पीडित महिलेलाच गप्प केले. यावरून विभागात 'प्रवीण अण्णा'ची दहशत नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

प्रशासकीय वर्तुळात संताप
शासकीय कार्यालयात महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी 'विशाखा समिती'सारख्या यंत्रणा कागदावर असताना, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र महिलांना रडत घरी जावे लागत आहे. एका महिला कर्मचाऱ्याचा अपमान होत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या आणि तक्रार दडपणाऱ्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही आता बोट ठेवले जात आहे.

​"एकीकडे शासन महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे सरकारी कार्यालयातच महिलांना अशा पद्धतीची वागणूक मिळते. या प्रकरणी दोषी प्रवीण अण्णा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? की हा प्रकार नेहमीप्रमाणे दडपला जाणार?"
क्रमश.....


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.