Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागातील झिरो 'प्रवीण अण्णा'च्या दहशतीला 'सांगली दर्पण'चा दणका; मुजोर कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांत संतापाची लाट!​

सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागातील झिरो 'प्रवीण अण्णा'च्या दहशतीला 'सांगली दर्पण'चा दणका; मुजोर कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांत संतापाची लाट!


सांगली :- राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा झालेला अपमान आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली संशयास्पद भूमिका आता या विभागाच्या प्रतिमेला काळिमा फासत आहे. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीला केराची टोपली दाखवल्याने, हा विभाग नेमका कोणासाठी काम करतोय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

​'प्रवीण अण्णा'चा राबता आणि वरिष्ठांचे मौन

विभागात सतत वावर असणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या 'प्रवीण अण्णा' नावाच्या व्यक्तीच्या दहशतीमुळे कर्मचारी त्रस्त आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ अधिकारी या गंभीर तक्रारींची दखल घेण्याऐवजी तक्रारदारांनाच दबावाखाली ठेवत असल्याचे वृत्त आहे. मात्र, काल प्रसिद्ध झालेल्या बातमीने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली असून, आता तरी या मुजोर व्यक्तीचा विभागातील वावर बंद होईल, अशी आशा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

​'सांगली दर्पण'समोर 'साकडे' फेल!
आपल्या काळ्या कारभारावर पडदा टाकण्यासाठी प्रवीण अण्णाने अनेक ठिकाणी धावपळ केली. बातमी दडपण्यासाठी अनेकांना 'साकडे' घातले, आर्थिक रसद पुरवण्याच्या हालचाली केल्या. मात्र, सत्याची पाठराखण करणाऱ्या **'सांगली दर्पण'**ने या सर्व प्रयत्नांना धुळ चारली आहे. जनतेसमोर वास्तव मांडण्याची भूमिका घेतल्याने आता या प्रकरणातील दोषींना पळता भुई थोडी झाली आहे.
​आता 'त्या' वरिष्ठांची खैर नाही?

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, हे प्रकरण आता वरिष्ठांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, आतापर्यंत 'अण्णा'ला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिला कर्मचाऱ्याचा अपमान आणि कर्मचाऱ्यांवरील दडपशाही यावर आता कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​जशास तसे उत्तर देण्यासाठी 'सांगली दर्पण' कटिबद्ध आहे!



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.