विश्रामपुर: येथील भाजपचे ज्येष्ठ नेते कमलेश चौबे यांचे बुधवारी सकाळी सुरजपुर जिल्ह्यातील कुमडा-विश्रामपुर रस्त्यावर झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले आहे. या घटनेमध्ये आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर त्यांची कार झाडाझुडपांमध्ये अडकली असून कार चालक त्याठिकाणाहून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि भाजप नेत्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी कार जप्त केली असून ड्रायव्हरवर गुन्हा नोंदवला आहे.
कमलेश चौबे हे 60 वर्षाचे होते. त्यांचा किराणा आणि पान मसाल्याचा व्यवसाय देखील होता. बुधवारी सकाळी ते व्यवसायाच्या कामासाठी आपली दुचाकीवरून कुमडा-कासकेला येथे गेले होते. काम आटोपून विश्रामपुरला परत येत असताना, कुमडा रस्त्यावरील बाबा मस्तनाथ मंदिराजवळ मागून येणाऱ्या गाडीने त्यांच्या दुचकीला जोरदार धडक दिली. यामुळे कमलेश चौबे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर विश्रामपुर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. जिथे त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर, कुटुंबीयांनी पार्थिव अंतिम संस्कारांसाठी झारखंडमधील गरवा जिल्ह्यातील हसनदाग मेरल या त्यांच्या मूळ गावी नेले. दिवंगत कमलेश चौबे हे झारखंड भाजप युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष विनय चौबे यांचे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा संपूर्ण परिवार आहे. या अपघाताचे वृत्त समजताच भाजपच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला असून पक्षात हळहळ व्यक्त केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.