धक्कादायक: उत्पादन शुल्क विभागाची बदनामी करणाऱ्या 'प्रवीण अण्णा'चा माज उतरवणार; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा 'नो एन्ट्री'चा फतवा!
विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अण्णाची आता 'गच्छंती' अटळ; जिल्ह्याभरात चर्चांना उधाण.
सांगली : राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 'प्रशांत अण्णा'. आपल्या वागणुकीमुळे आणि कारभारा मुळे संपूर्ण विभागाची बदनामी होत असल्याचा ठपका ठेवत आता वरिष्ठांनी या अण्णाविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. "काहीही करून प्रशांत अण्णांचा विषय संपवा," असे स्पष्ट आदेश एका वरिष्ठ अधिकाऱ्याने देऊनही, अण्णांचा 'ठेका' आणि 'तोर' कमी व्हायला तयार नाही. यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.
'नो एन्ट्री'चा फतवा आणि अण्णांचा अंहकार
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, जिल्ह्यातील एकाही उत्पादन शुल्क कार्यालयात प्रशांत अण्णांना प्रवेश देऊ नये, असा अघोषित 'नो एन्ट्री'चा फतवाच काढण्यात आला आहे. एका मध्यस्थाने अण्णांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, "बाहेर भेटू, मी त्यांच्या ऑफिसला जाणार नाही, एनी हाऊ (Any How) मी जाणारच नाही," अशी मुजोरी अण्णांनी दाखवली आहे. अण्णांच्या या उद्धटपणामुळे विभागातील शिस्तप्रिय अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आता थेट 'गच्छंती'ची तयारी!
विभागाची नाहक बदनामी थांबवण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, "अण्णांचा माज आता मर्यादेबाहेर गेला आहे. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या या 'प्रशांत अण्णा'ची आता उत्पादन शुल्क विभागातून गच्छंती अटळ आहे. नियमांचे उल्लंघन आणि विभागाची प्रतिमा खराब करणाऱ्याला आता कोणतीही माफी मिळणार नाही."कार्यालयात बंदी: जिल्ह्यातील सर्व उत्पादन शुल्क कार्यालयांचे दरवाजे अण्णांसाठी बंद.मुजोरी कायम: "बाहेर भेटू" म्हणत अण्णांचे प्रशासनाला उघड आव्हान.कडक कारवाईचे संकेत: लवकरच अण्णांच्या पत्ता कट होण्याची शक्यता.प्रशांत अण्णांच्या या प्रकरणाने उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली असून, आता ही 'स्वच्छता मोहीम' नक्की कधी पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.क्रमश
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.