Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"पर्याय शोधून दाखवाच!" म्हणणाऱ्या बॉसला तरुणीचं सडेतोड उत्तर; भर मिटिंगमध्ये राजीनामा देऊन सोडली नोकरी.

​"पर्याय शोधून दाखवाच!" म्हणणाऱ्या बॉसला तरुणीचं सडेतोड उत्तर; भर मिटिंगमध्ये राजीनामा देऊन सोडली नोकरी.


कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढता ताण आणि वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील एका महिला कर्मचाऱ्याने सार्वजनिकरित्या झालेल्या अपमानाचा निषेध म्हणून थेट राजीनामा दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. राजीनामा देताना या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसला दिलेलं आव्हान सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

माहितीनुसार, संबंधित कंपनीत एका महत्त्वाच्या मिटिंगवेळी बॉसने या कर्मचाऱ्याचा सर्वांसमोर अपमान केला होता. माझं म्हणणं जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर उद्यापासून घरी बसलात तरी काही फरक पडणार नाही, असा धमकीवजा इशारा देतानाचा एक ऑडिओ देखील या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा प्रकार केवळ कामापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक अपमानापर्यंत पोहोचल्यानं तिनं त्याच वेळी आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

संबंधित महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या दाव्यानुसार, तिनं फक्त कंपनीसाठी जे कामाच्या तासाव्यतिरिक्त अतिरिक्त काम केलं. त्याचा मोबदला मागितला होता. त्यावर तिला बॉसनं सर्वांसमोर खडेबोल सुनावले. मग तिने राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आणि वरिष्ठांना थेट आव्हान दिलं. "माझी रिप्लेसमेंट शोधण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! माझ्यासारखी कामाप्रती निष्ठा असलेली व्यक्ती तुम्हाला पुन्हा मिळणार नाही", असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या निर्भीड उत्तराची सोशल मीडियात चांगलीच हवा झाली आहे. काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी कॉर्पोरेट शिष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

सध्याच्या काळात अनेक कंपन्यांमध्ये 'टॉक्सिक वर्क कल्चर' वाढत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानापेक्षा केवळ टार्गेट्सना महत्त्व दिले जात असल्यानं तरुण पिढीमध्ये संतापाचं वातावरण आहे. मुंबईतील या घटनेने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची सन्मानजनक वागणूक या विषयावर चर्चेला तोंड फोडलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.