महाराष्ट्र पोलीस दलात मोठा भूकंप ! कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारीसो यांची पुणे सीआयडी येथे बदली
१९ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुंबई, नाशिक, ठाणे, पुण्यात मोठी उलथापालथ
मुंबई : राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस दलात मोठा प्रशासकीय भूकंप घडवून आणला आहे. तब्बल १९ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे, कोकण, कोल्हापूरसह अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक असलेले कृष्ण प्रकाश यांच्याकडे आता प्रशिक्षण विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची प्रशिक्षण विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रविण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील गुन्हे शाखेचे पोलीस सह आयुक्त लखमी गौतम यांना कायदा व सुव्यवस्था विभागात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी मनोज शर्मा यांची मुंबई प्रशासन विभागात बदली झाली आहे.दहशतवाद विरोधी पथकातही मोठे फेरबदल करण्यात आले असून परमजीत दहिया यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी पदोन्नती देत एटीएसची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातही मोठे बदल झाले आहेत. संजय येनपुरे यांना व्हीआयपी सुरक्षा विभागात पाठविण्यात आले असून दीपक साकोरे यांना नवी मुंबईचे पोलीस सह आयुक्तपद देण्यात आले आहे.राज्य सरकारच्या या मोठ्या निर्णयामुळे पोलीस दलात नव्या समीकरणांना सुरुवात होणार असल्याची चर्चा मंत्रालयीन वर्तुळात रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.