सांगली मनपात महाभूकंप! बोगस नालेसफाईचे पाप अधिकाऱ्यांच्या गळ्यात; ठेकेदाराला वाचवताना 'साहेब'च अडकले, फौजदारीची टांगती तलवार!
सांगली : नगरसेवकांच्याआग्रहामुळे नालेसफाईचे लॉग बुक सादर करण्याच्या गडबडीत खोटे लॉग बुक आरोग्य विभागाकडून बनवले गेल्याने केवळ आरोग्य विभागच नव्हे तर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा अडचणीत आले आहेत.
याप्रकरणी मनपाच्या बरिष्ठ अधिकाऱ्यावर फौजदारी दाखल होण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कंत्राटदारानी तयार करायचे लॉग बुक अधिकाऱ्यांनीच बनवून बनावटगिरी केल्याचे उघडकीसआले असल्याने हे प्रकरण गांभिर्याने घेतल्यास संबंधित अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवरफौजदारी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.आता जर बनावट लॉग बुक महापालिकेच्या रेकॉर्डला जमा दाखवले असेल आणि ते रेकॉर्ड चा भाग झाला असेल तर संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई निश्चित आहे. लेखापरीक्षकांचे आक्षेप अत्यंत गंभीर असताना खोटे लॉग बुक करून ठेकेदाराला वाचवण्याच्या नादात महापालिका अधिकारी वर्ग अडचणीत आला आहे. आता यात फौजदारी कोणाकोणावर होणार, महापालिकेचे नगरसेवक हे प्रकरण ताणून धरणार की सेटलमेंट करणार याकडे महापालिका क्षेत्राचे लक्षलागले आहे.
याप्रकरणी स्थायी समिती आणि महासभा कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. महापालिकेत मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीला आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांनी अशी वेगवेगळी बोगस २१ लॉग बुक सादर केली होती. स्थायी सभापती अतुल माने आणि सदस्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर स्थायी सभापती माने यांनी याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा नेमका किती वापर झाला आणि इंधनाचा किती गैरवापर झाला हे समजून येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.