Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांवर निवडणूक जाहीर; कधी आहे मतदान आणि निकाल?

विधान परिषदेचा बिगुल वाजला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागांवर निवडणूक जाहीर; कधी आहे मतदान आणि निकाल?


मुंबई, : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रलंबित १६ विधानपरिषद जागांसाठी अखेर निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उमेदवारी, पक्षांतर आणि राजकीय समीकरणांना आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या जागा रिक्त होत्या. त्यामुळे विधान परिषदेचे संख्याबळही कमी झाले होते. मात्र, अलीकडेच अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाली आहे. नियमानुसार संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेता येते. ही अट पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अखेर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.  
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिल्या जाणाऱ्या १६ जागांसह एका जागेची पोटनिवडणूक होणार आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठीही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.  दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता असून, काही मतदारसंघांमध्ये धक्कातंत्र आणि क्रॉस व्होटिंगचीही चर्चा सुरू झाली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.