Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रावर पुढचे ७२ तास 'अग्निकल्लोळ'! अवकाळीनंतर आता १० जिल्ह्यांना सूर्याचा विळखा; थेट 'हिटवेव्ह'चा हाय-अलर्ट

महाराष्ट्रावर पुढचे ७२ तास 'अग्निकल्लोळ'! अवकाळीनंतर आता १० जिल्ह्यांना सूर्याचा विळखा; थेट 'हिटवेव्ह'चा हाय-अलर्ट


इराणच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आले. तिथून पाकिस्तानच्या दिशेनं गरम हवा वाहायला सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात उष्ण वारे वाहात आहेत. पश्चिमेकडून देखील उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे भारतात प्री मान्सूनआधी हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. शुष्क आणि कोरडे वाहात आहे. त्यामुळे हिटवेवचा धोका वाढला महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील हवामानात आता एक मोठा बदल होत आहे. देशातील वादळी पाऊस आणि ओलेचिंब करणारे हवामान आता पूर्णपणे ओसरले असून, राज्यासह मध्य भारतावर पुन्हा एकदा भीषण उन्हाचा तडाखा बसणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आधीच ४५ ते ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत राज्याच्या अनेक भागांत तापमानात आणखी ३ ते ५ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात तुरळक पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात अंगाची लाहीलाही

सध्या पाकिस्तान आणि बलूचिस्तानच्या भागातून थेट मध्य भारताच्या दिशेने अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. या गरम वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे. पुढील काही दिवस नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१८ मे पासून मुंबई आणि कोकणात पावसाची एन्ट्री!
विदर्भात उन्हाचे चटके बसत असताना, मुंबईसह राज्याच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मात्र मान्सूनपूर्व हालचालींना वेग येणार आहे. हवामान मॉडेलनुसार, १८, १९ आणि २० मे रोजी दक्षिण मुंबई, ठाणे, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि थेट गोवा किनारपट्टीपर्यंत पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मान्सून अंदमानात पोहोचला; पण महाराष्ट्रात कधी?

हवामान क्षेत्रातून सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे, मान्सूनने बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात वेळेआधीच धडक दिली आहे. अंदमानात २२ मे रोजी पोहोचणारा मान्सून तब्बल ६ दिवस आधी, म्हणजेच १६ मे रोजीच दाखल झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदा २६ मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तवला आहे, यादरम्यान ४ दिवस पुढे-मागे होऊ शकतात. अंदमानात मान्सून लवकर आला असला तरी अरबी समुद्रात सध्या एक 'अँटी-सायक्लोन' (विपरीत चक्राकार वारे) सक्रिय आहे. जोपर्यंत हा अँटी-सायक्लोन हटत नाही, तोपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकणार नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून केरळमध्ये वेळेवर आला तरी महाराष्ट्रातील प्रवासासाठी त्याला नेहमीचाच वेळ लागेल:

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार
५ जून: मान्सून संपूर्ण केरळ, कर्नाटक व्यापून गोव्यापर्यंत पोहोचेल.
१० जून: मुंबई आणि लगतच्या महाराष्ट्राच्या भागात मान्सूनची अधिकृत एन्ट्री होईल.
१५ जून: मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून मध्य प्रदेशाकडे कूच करेल.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जोपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे अधिकृत आगमन होत नाही, तोपर्यंत उन्हाचा कडाका सहन करावाच लागेल. त्यातही १० जूननंतर हवेची दिशा बदलणार असल्याने उन्हाच्या चटक्यांसोबत हवेतील आर्द्रता वाढेल. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांना प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.