सांगली : उसने घेतलेल्या पैशांच्यावादातून अष्टविनायकनगर परिसर सोमवारी रात्री अक्षरशः हादरला. भररस्त्यात चाकूने भोसकण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सूरज राजू कांबळे (वय १९, रा. गणेश कॉलनी, वारणाली रस्ता, सांगली) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी अटककरण्यात आलेल्या निहाल रियाज रंगारी आणि बिलाल रियाज रंगारी (दोघे रा. गंगानगर, सांगली) या दोघा भावांवर संजयनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सूरज कांबळे हा पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम करत होता. त्याने संशयितांकडून काही पैसे उसने घेतले होते. संशयित दोघा भावांचे चिकन दुकान आहे. शनिवारी रात्री सूरज हात्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासह दुचाकीवरून अष्टविनायकनगर परिसरातून जात असताना रंगारी बंधूंनी त्याला अडवले.उसने दिलेल्या पैशांची मागणी करताच दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर निहाल रंगारी याने सूरजचे हात पकडून “याला संपवून टाक” अशी आरोळी ठोकल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिलाल रंगारी याने कमरेला लावलेला धारदार चाकू काढून थेटसूरजच्या पोटात वार केला.गंभीर जखमी झालेला सूरज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला, तर त्याचा मित्र आर्यन भीतीने घटनास्थळावरून पळून गेला. हल्ल्यानंतर संतापलेल्या संशयितांनी सूरजच्या दुचाकीचीही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत सूरजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी रात्री उशिरा त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.