Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा पुन्हा माज! नोटांचे हार घालून अग्रवाल कुटुंबाचा निर्लज्ज डान्स व्हायरल; जनतेत तीव्र संताप!

पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा पुन्हा माज! नोटांचे हार घालून अग्रवाल कुटुंबाचा निर्लज्ज डान्स व्हायरल; जनतेत तीव्र संताप!


पुणे:  पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हायप्रोफाइल पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या भीषण अपघातात दोन निष्पाप आयटी इंजिनिअर्सचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

या प्रकरणातील रक्ताचे नमुने बदलण्याच्या कथित कटातील एका मुख्य आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. आरोपीने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली. अग्रवाल कुटुंबाच्या पार्टीचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो विशाल अग्रवाल तुरुंगातून सुटून आल्यानंतरचा असल्याचा दावा केला जात आहे.

या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यात नोटांचे मोठे हार दिसत असून, "मुंबई से आया मेरा दोस्त..." या गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात डान्स करताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. या पार्टीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन निष्पाप तरुणांचा जीव गेलेल्या प्रकरणात पीडित कुटुंबीय अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत असताना आरोपी कुटुंब अशा प्रकारे जल्लोष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशाल अग्रवाल यांना न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला असला, तरी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे त्यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.