देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियावर या पार्टीचे चाहते वाढत चालले आहेत. देशभरात चळवळीतून उभी राहिलेली मोहिमचे राजकीय पक्षात रुपांतर होणार का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रश्नावर 'कॉकरोच जनता पार्टी' प्लॅटफॉर्मचा संस्थापक अभिजीत दिपके यांनी 'नक्कीच होईल, पण आता सांगण थोडं अवघड आहे', अशी प्रतिक्रिया एका वाहिनीसोबत संवाद साधताना दिली.
अशातच अभिजीतने राजकारणात जाऊ नये, त्याने ही चळवळ थांबवावी, अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे. अशा राजकारणामुळे आपल्या मुलाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागेल किंवा त्याला अटकही होऊ शकेल, अशी भीती त्यांना वाटत असल्यामुळे अभिजित दिपके यांच्या आई-वडिलांचे असे म्हणणे आहे.
दरम्यान, सतत चर्चेत असणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'तुला पैसे मिळतील, तू तुझं सोशल मीडिया अकाऊंट बंद करून टाक, असं म्हणत ही धमकी देण्यात आली आहे. तसेच अकाऊंट बंद न केल्यास अमेरिकेत येऊन मारण्याचा उल्लेख या धमकीमध्ये करण्यात आला आहे.या प्रकरणी अभिजित दिपकेंनी थेट धमकी देणाऱ्याचा मोबाईल नंबर एक्स पोस्ट (ट्विटर)द्वारे या प्रकाराची माहिती दिली आहे. 'आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत', असे कॅप्शन देत अभिजित दिपके यांनी फोटो शेअर करत समाजमाध्यमावर हा प्रकार समोर आणला आहे.
तथापि, या पोस्टवर अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केल्या आहेत. ज्यामध्ये एकाने 'तुझीच माणसं तुझी मज्जा घेत आहेत' असे म्हटले आहे. तर काही जणांनी हे एआय एडिटेड असल्याचे म्हटले आहे. तर एका वापरकर्त्याने 'या मृत्यूच्या धमक्यांचा कट रचणारा तूच आहेस' असे म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.