Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"तारीख ठरली, वर्दी सुटली! 'या' दिवशी मान्सून महाराष्ट्रात धडकणार; मुंबईची तुंबई होणार?"

"तारीख ठरली, वर्दी सुटली! 'या' दिवशी मान्सून महाराष्ट्रात धडकणार; मुंबईची तुंबई होणार?"


सध्या देशभरात उन्हामुळे लोकांचे हाल होत आहेत. महाराष्ट्रातही पारा चांगलाच तापत आहे. दरम्यान, आता जून महिना सुरू व्हायला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाच यावेळी राज्यात मान्सून नेमका कधी येणार, असे विचारले जात आहे.
दरवर्षी देशात सर्वात अगोदर केरळमध्ये मान्सून प्रवेश करतो. त्यानंतर संपूर्ण देशभर मान्सून दाखल होते. यावेळी 26 मे रोजीपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून साधारण 1 जून रोजी दाखल होत असतो. यावेली मात्र तो लवकर केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून वर सरकतो. तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यांत प्रवेश करतो. यंदा 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून दाखल होत असताना मुंबईत मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
10 जून रोजी महाराष्ट्रात आल्यानंतर येत्या 15 जून रोजी मान्सून मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये 25 जून ते 5 जुलैपर्यंत मान्सून पोहोचू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याआधी अगोदर हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा. पावसाची स्थिती कशी असेल, मान्सून नेमका कधी येईल? या बाबी समोर ठेवूनच शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी, असे सांगितले जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.