Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"आम्हाला योजना नको, सुरक्षा हवी!" भोरमधील त्या घटनेनंतर बहिणींचा टाहो; योजनेच्या लाभावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह

​"आम्हाला योजना नको, सुरक्षा हवी!" भोरमधील त्या घटनेनंतर बहिणींचा टाहो; योजनेच्या लाभावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह


आमची सुरक्षितता सरकार बाळगत नसेल तर लाडकी बहीण देऊन उपयोग काय? असा संतप्त प्रश्न नसरापूर  गावातल्या महिलांनी उपस्थित केला आहे. ज्या चिमुकली सोबत हे अमानवी , राक्षसी कृत्य केलं तिला आम्ही खेळताना, बागडताना बघितलं आहे.

त्या नराधमाला आमच्यासमोर आणा, त्याला फाशिचीच शिक्षा द्या, अशीआग्रहीमागणीही पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावातल्या महिलांनीकेलीआहे. 

 आम्ही त्या चिमुरडी खेळताना, बागडताना बघितलं

पुण्यातील भोर परिसरात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्याचा अमानवी 

आणि संतापजनक घटना उजेडात आली आहे. यातील मृत अल्पवयीन मुलगी नसरापूरला तिच्या आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी एका नराधमाने तिला जवळच असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार  केला, आणि त्यानंतर तिची हत्या करण्यातआली. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संशयित व्यक्तीला पकडले असून पोलिसांनी  त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र, या व्यक्तीने आपण मुलीवर अत्याचार केल्याची बाब नाकारली आहे. दरम्यान, या घटनेनंतर शुक्रवार रात्री नसरापूर येथील वातावरण तापले होते.  

एकंदरीत याप्रकरणाने राज्यात खळबळउडालीअसून संतप्त प्रतिक्रियाउमटू लागली आहे.

नसरापूर ग्रामस्थांचा संताप, गावात कडकडीत बंद

भोर तालुक्यातील नसरापूर गावात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधनाला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. असेनसेलहोततर तर त्यानराधमाला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघू, असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं

नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता मात्र साडेतीन वाजताच ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्ख कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातली, रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढली, त्यानंतर गावकऱ्यांनी मोर्चा मागे घेतला, पण आज या अत्याचाराचा विरोधात ग्रामस्थांचा मोर्चा सुरू झाला आहे. गावातील भैरवनाथ मंदिराजवळ हा मोर्चा सुरू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.