Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोनं, तेल अन् वर्क फ्रॉम होम; पंतप्रधान मोदींनी भारतीयांना 'या' ९ गोष्टींपासून दूर राहण्याचा का दिला सल्ला? वाचा सविस्तर

सोनं, तेल अन् वर्क फ्रॉम होम; पंतप्रधान मोदींनी भारतीयांना 'या' ९ गोष्टींपासून दूर राहण्याचा का दिला सल्ला? वाचा सविस्तर


तेलंगणमधील सिकंदराबाद येथील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीयांना इराण आणि इस्रायल, अमेरिकेदरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक परिस्थिती लक्षात घेत काही आवाहने केली आहेत. सोन्यापासून ते कच्च्या तेलापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला आहे. मोदींनी सर्वसामान्य भारतीयांकडे एकूण नऊ गोष्टींसदर्भात सतर्क राहण्यास सांगितलं आहे. 

या नऊ गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात...
@ वर्षभर लग्नासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान केलं आहे.

@ आपल्या देशाकडे तेलाच्या मोठमोठ्या विहिरी नाहीत असंही मोदींनी भाषणात म्हटलं असून यामधून त्यांनी तेल म्हणजेच इंधन जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

@ परदेशी दौरा किंवा पर्यटनासाठी परदेशात जाणार असाल तर असा दौरा पुढल्या वर्षापर्यंत पुढे ढकला असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

@घरुन काम करण्यास प्राधान्य द्या. जास्तीत जास्त लोक घरुन काम करतील याची काळजी घ्यावी असंही मोदींनी म्हटलंय.

@ जेवणातील तेलाचा वापर कमी करा. आर्थिक आरोग्य आणि वैयक्तिक शारीरिक आरोग्यासाठीही हे फायद्याचं ठरेल, असा उल्लेख मोदींनी केला आहे.

@पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा. यासाठी मेट्रोचा पर्याय प्रवासासाठी वापरा. यामुळे परदेशी चलन वाचवण्यास मदत होईल.

@ आपण कार वापरणारच असून तर कार पुलिंगचा पर्याय आवर्जून वापरा. इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक अधिक वापर करा, असंही मोदी म्हणालेत. कार पुलिंग ही कार असलेली व्यक्ती एकटीच एखाद्या ठिकाणी जात असेल तर तिने त्याच ठिकाणी जाणाऱ्या इतरांनाही पैसे घेऊन सोबत न्यावं अशी संकल्पना आहे.

@रासायनिक खतांचा वापर 50 टक्क्यांनी कमी करा. सौरऊर्जेवर चालणारे सोलार पंप वापरा. डिझलेच्या पंपांपेक्षा सोलार पंपांना प्राधान्य द्या, असं मोदींनी म्हटलं आहे.

@ मेड इन इंडिया म्हणजेच भारतात तयार झालेल्या, उत्पादन घेण्यात आलेल्या वस्तूंना प्राधान्य द्या. स्थानिक वस्तू अधिक अधिक प्रमाणात विकत घ्या, असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
या साऱ्या गोष्टी मोदींनी का सांगितल्या?

पंतप्रधान मोदींनी केलेल्या या आवहानांकडे पाहिल्यास सर्वांचा हेतू हा परदेशी चलन कमीत कमी खर्च करण्याचा आहे. सोनं असेल, इंधन असेल किंवा अगदी रासायनिक खतं असतील या साऱ्यावर भारत मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्रामुख्याने डॉलर खर्च करतो. त्यामुळे भारताकडे असलेले परकीय चलन कमी होतं. परदेशी व्यापारावर अवलंबून असलेल्या देशांना अशाप्रकारे परकीय चलनाचा साठा कमी झालेलं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळेच हाती जास्त परकीय चलन असेल तर त्या देशाचं चलन देखील मजबूत राहतं. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी ही आवहानं केली आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.