Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खरात घोटाळ्याचा बॉम्ब फुटला! मंत्रिमंडळातील ४ बड्या मंत्र्यांचे धाबे दणाणले; भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत!

खरात घोटाळ्याचा बॉम्ब फुटला! मंत्रिमंडळातील ४ बड्या मंत्र्यांचे धाबे दणाणले; भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत!


नाशिकच्या गाजलेल्या खरात प्रकरणात आता मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची नावे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता परत एकदा खळबळ उडाली आहे. खरात यांच्या प्रकरणातून आता मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची नाव समोर आली आहेत. त्यामुळं आता एकच चर्चा रंगली आहे. या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायला हवं असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे. या मंत्र्यांची माहिती देऊन त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नाना पटोले यांनी यावेळी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला आहे. "आम्ही यापूर्वीही विधानसभेत या विषयावर आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले, तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल.

मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचं यावेळी नाना पटोले यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, ही आमची प्रमुख मागणी आहे." नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं आहे. खरात याने अनेक व्यावसायिकांची फसवणूक केल्याचं दिसून आलं आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे आणि खरातचे जवळचे संबंध असल्याचे देखली उघड झाले. आता खरात प्रकरणात आणखी चार मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.