Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पुणे पोलीस दलात खळबळ" :, २९ लाखांच्या लाचप्रकरणी दोन बडे अधिकारी जाळ्यात!

"पुणे पोलीस दलात खळबळ" :, २९ लाखांच्या लाचप्रकरणी दोन बडे अधिकारी जाळ्यात!

पुण्यामध्ये २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली

एकाच दिवशी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडलं. या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना एकाच दिवशी अटक करण्यात आल्यामुळे पुणे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली. लोहगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या दोघांना वेगवेगळ्या प्रकरणात लाच घेताना अटक करण्यात आली. या घटनेमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला.

पुण्यामध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्याला २८ लाखांची लाच घेताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. लोहागाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची नेमणूक आहे. वैशाली तोटेवार यांनी खासगी व्यक्तीच्या मार्फत कोंडऱ्याड हॉटेलच्या परिसरात लाच स्वीकारली. यावेळी वैशाली तोटेवार आणि संबंधीत व्यक्तीला देखील एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. तोटेवार यांनी ही लाच नेमकी कोणासाठी घेतली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तोटेवार यांची नुकतीच लोहमार्ग मुंबई येथे बदली झाली असून त्यांना कार्यमुक्त देखील करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ही लाच स्वीकारली आहे.

दुसऱ्या प्रकरणामध्ये लोहगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अत्यंत शिताफीने रचलेल्या सापळ्यात त्यांन लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. जमिनीच्या व्यवहारातील प्रकरणात मदत करण्याच्या नावाखाली सेटिंग करण्याचा खेळ सुरू असतानाच हा सापळा यशस्वी झाला. तक्रारदार हा जमीन व्यवसायाशी संबंधित असून त्याच्याविरोधात दाखल अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि भविष्यात सुरक्षितता देण्याच्या बहाण्याने मनोज बरुटे यांनी सुरुवातीला ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पडताळणीदरम्यान ही रक्कम थेट ८० हजारांवर नेण्यात आली हे स्पष्ट झाले.

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष सर्व प्रक्रिया पूर्ण करून १ मे रोजी सापळा रचला. लोहगाव पोलिस ठाण्याच्या आवारातच ८० हजार रुपये स्वीकारताना मनोज बरुटे यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत आरोपीकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून सुमारे ७० हजार रुपये किंमतीचा मोबाइल देखील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीच्या निवासस्थानी झडती सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.