Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोकुळच्या राजकारणात मोठा भूकंप: तुकाराम मुंडे प्रशासक म्हणून येणार? शिवाजी पाटलांच्या वक्तव्याने खळबळ!

गोकुळच्या राजकारणात मोठा भूकंप: तुकाराम मुंडे प्रशासक म्हणून येणार? शिवाजी पाटलांच्या वक्तव्याने खळबळ!

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात सुरू असलेल्या गोकुळच्या राजकारणावरून आरोप प्रत्यारोपाचा खेळ आज ही रंगला. शिवाय गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यावर ईडी चौकशी लावावी अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर आबाजी हेच गोकुळमधील मुख्य बाबाजी आहेत. शिवाय मुश्रीफ यांनी माझा जो काय पूर्व इतिहास बाहेर काढायचा तो काढू देत. माझी सर्वोत्तोपरी तयारी आहे. मी जनतेच्या पैशावर डल्ला मारत नसल्याचा टोला आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुश्रीफांना लगावला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांची गोकुळमध्ये पाहिली टर्म आहे. आबाजी आणि डोंगळे हे पंचवीस वर्षांपासून सत्तेत आहेत. डोंगळेची दुबईमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आबाजी हे गोकुळमधील मुख्य बाबाजी आहेत. माझी प्रामाणिक इच्छा आहे की यांची चौकशी झाली पाहिजे.

यामुळे गोकुळवर प्रशासक म्हणून तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीची मागणी करणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. तर डोंगळे व विश्वास पाटील यांच्या बाबतची चौकशीचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले आहे.

प्रशासक आणल्यानंतर गोकुळमध्ये नेते किती मलई खातात हे लक्षात येईल. राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातीलच संचालक अधिक आहेत. दुर्गम तालुक्यातील सर्वसामान्य घरातील संचालक यांना नकोत का? असा सवाल करत मुश्रीफ यांची ताकद आहे. त्यामुळे ते बोलत असतील, पण माझी ताकद ही प्रामाणिकपणा आहे. कोणाच्या पाठीशी राहायचं याचा निर्णय ठरावधारक चौकशी नंतरच घेतील, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

मुश्रीफ साहेबांनी माझा पूर्वा इतिहास काढावा मी त्याची वाट पाहत आहे. माझी तयारी आहे, बुधवारी माझ्या बाबत मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे. मी कोणाला फसवलेलं नाही, जनतेचा गल्ला लुटलेला नाही, प्रामाणिक आहे. जे आहे ते मुश्रीफ साहेबांनी बाहेर काढावं, इतकी ताकदीचे आहेत तर सत्य सोडून का बोलतात? असा सवाल आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांना केला.

हसन मुश्रीफ हे मोठ्या ताकतीचे नेते आहेत. ते 40 वर्षापासून राजकारणात आहेत राष्ट्रवादीचे ते दिग्गज नेते आहेत. त्यांनी त्यांची ताकद ही चंदगडमध्ये देखील दाखवलेली आहे. पण मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या बद्दल माझं व्यक्तिगत वैर नाही. मला गोकुळ दूध संघाच्या भ्रष्ट कारभाराबाबत बोलायचं आहे.

प्रशासक लावून गोकुळ मधील भ्रष्ट कारभाराबाबत दूध का दूध और पाणी का पाणी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासक आल्यानंतर जी चौकशी होईल ते सत्य समोर येईल. गोकुळच्या निवडणुकीत आता ठराव धारक विचार करतील आपण कोणासोबत राहायचं आहे. त्याच त्याच संचालकांसोबत राहायचं की घराणे शाही सोबत राहायचं हे ठराव धारक विचार करतील, असेही आमदार पाटील म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.