आरटीओचा दणका: सीसीटीव्ही आणि जीपीएसशिवाय स्कूल बस धावणार नाहीत; नियम मोडल्यास बस होणार जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासह, जीपीएस लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासह, जीपीएस लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासह, जीपीएस लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी ही एक जूनपासून केली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घेतलेल्या या निर्णयांचे उल्लंघन केल्यास संबंधीत स्कूल बसचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आली आहे.
जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक १२ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष सूचना सदस्यांनी केली होती. तसेच या सूचनांचे पालन करण्याबाबतही आदेशित करण्यात आले होते. या निर्णयाबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत स्कूल बसमधून विद्यार्थी सुरक्षित प्रवासासाठी निर्णय घेण्यात आले. यात सर्व स्कूल बसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच प्रत्येक शाळेच्या स्कूल बसमध्ये जीपीएस सिस्टिम चालू असावी, तसेच सहा वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी तसेच मुली असलेल्या शाळांमध्ये स्कूलमध्ये महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती बंधनकारक राहणार आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पॅनिक बटण कार्यान्वित करण्यात यावे. असेही आदेश जारी करण्यात आले आहे.
या नियमांचे पालन करणे ही प्रत्येक शालेय व्यवस्थापनासह विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसाठी नेमण्यात आलेल्या समितींना आवश्यक करण्यात आली आहे, अशीही माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली आहे.
एक जूनपासून अशी होणार कारवाई
शालेय व्यवस्थापनाने स्कूल बसमध्ये सीसीटिव्ही बसविण्याची कार्यवाही न केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवस परवाना निलंबित, तसेच तिसऱ्या गुन्ह्यासाठी स्कुल बस परवाना रद्द करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव.
वाहनामध्ये जीपीएस कार्यान्वित करणे आवश्यक आहे. हे न झाल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवस परवाना निलंबन, तसेच तिसऱ्या गुन्ह्यासाठी बस परवाना रद्द करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव.
पॅनिक बटण आवश्यक हे न झाल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवस परवाना निलंबित, तसेच तिसऱ्या गुन्ह्यासाठी बस परवाना रद्द करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव.
बसमध्ये सहा वर्षांखालील मुलांना ने-आण करण्यासाठी तसेच मुली असलेल्या स्कूलमध्ये महिला कर्मचारी नियुक्ती आवश्यक. हे नसल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी ६० दिवस परवाना निलंबित, तसेच तिसऱ्या गुन्ह्यासाठी बस परवाना रद्द करण्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत स्कूल बसमधून विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी एक जूनपासून होणार आहे. कारवाई सुरू झाल्यास, विद्यार्थ्यांच्या गैरसोयीसाठी संबंधित शाळा प्रशासन तसेच स्कूल बस कंत्राटदार जबाबदार राहतील.
-विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.