Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सावधान! पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू होणार? मोदींच्या आवाहनानंतर 'या' ७ गोष्टींची तयारी ठेवा!"

"सावधान! पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू होणार? मोदींच्या आवाहनानंतर 'या' ७ गोष्टींची तयारी ठेवा!"


इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा थेट जगावर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका भारताला देखील बसलाय. या युद्धामुळे भारताला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सिलिंडरचा तुटवडा, पेट्रोल-डिझेलसाठी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या.
मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी मोदींनी जनतेल्या केलेल्या आवाहनांची मोठी चर्चा सुरू आहे. सर्वात जास्त चर्चा आहे ती वर्क फ्रॉम होमची. भारतात कोणत्याही क्षणी Work From Home सुरु होऊ शकतं अशी परिस्थिती असल्याची चर्चा आहे. Work From Home सुरु होण्याआधी 7 अत्यावश्यक वस्तू आत्ताच खरेदी करा. कारण नंतर या वस्तू मिळणे कठीण होऊ शकते. 

पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. पुढील एक वर्ष सोनं खरेदी करू नका. वर्षभर परदेशी प्रवास टाळा. खाद्यतेलाचा वापर मर्यादित जपून करा. कच्चं तेल वाचवण्यावर भर द्या. परकीय चलन वाचवण्यावर भर द्या. परकीय चलन साठा कमी होऊ द्यायचा नाही. जास्तीत जास्त मेट्रोने प्रवास करा. आवश्यक असल्यास, कोविड काळाप्रमाणेच वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन बैठका आणि व्हर्च्युअल कॉन्फरन्स यांना पुन्हा प्राधान्य द्यावे अशा सूचना मोदींनी केल्या आहेत.
पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर, येत्या काही महिन्यांत अनेक कंपन्या हायब्रीड किंवा वर्क-फ्रॉम-होम मॉडेलचा अवलंब करु शकतात अशी चर्चा आहे. यामुळे घरून काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि कार्यालयीन उत्पादनांच्या मागणीत अचानक वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, वाढलेली मागणी आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे या उत्पादनांच्या किमती वाढू शकतात किंवा अनेक वस्तूंचा साठा संपू शकतो.

लॅपटॉप आणि मॉनिटर

वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यास लॅपटॉप आणि मोठ्या डिस्प्ले मॉनिटर्सची मागणी वाढू शकते. कोविड-19 महामारीच्या काळातही अनेक कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध झाले नाहीत. यावेळीही, आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे, चांगल्या कॉन्फिगरेशनचे लॅपटॉप अधिक महाग होऊ शकतात.

हाय-स्पीड वाय-फाय राउटर
घरातून काम करताना इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे, ड्युअल-बँड आणि वाय-फाय 6 राउटर्सची मागणी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. पुरवठ्यावर परिणाम झाल्यास, त्यांच्या किमती वाढू शकतात.
नॉईज कॅन्सलेशन हेडफोन्स

घरातून काम करताना, ऑनलाईन मिटींग अटेंड करताना अडचण येवू नये यासाठी नॉईज-कॅन्सिलिंग हेडफोन्स आणि वायरलेस इअरबड्सच्या मागणीत झपाट्याने वाढ होऊ शकते. ऑफिस मीटिंग्ज आणि ऑनलाइन कॉल्ससाठी हे दोन्ही गॅजेट खूप महत्वाचे आहेत.

एर्गोनॉमिक खुर्च्या आणि टेबले
वर्क-फ्रॉम-होमचा कावाधी किती असू शकतो कुणालाच सांगता येवू शकत नाही. दीर्घकाळ घरून काम केल्याने पाठदुखी आणि मानदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे एर्गोनॉमिक खुर्च्या आणि ॲडजस्टेबल टेबलांच्या विक्रीत वाढ होऊ शकते. कोविड-19 महामारीच्या काळात अनेक शहरांमध्ये या वस्तू मिळत नव्हत्या.
इन्व्हर्टर आणि पॉवर बॅकअप

देशभरात अनेक ठिकाणी विजची समस्या आहे. अनेक ठिकाणी लोडशेडिंग होते. यामुळे वर्क-फ्रॉम-होम करताना कामात व्यत्यय येवू नये यासाठी इन्व्हर्टर, यूपीएस आणि पॉवर बॅकअप उपकरणांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

वेबकॅम आणि मायक्रोफोन
अनेक लॅपटॉपमध्ये कॅमेरा असला तरी, व्यावसायिक व्हिडिओ कॉलसाठी स्वतंत्र वेबकॅम आणि मायक्रोफोनची आवश्यकता असते. कंटेंट क्रिएटर्स आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांमध्ये यांची मागणी झपाट्याने वाढू शकते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.