Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"मोबाईलला द्या 'बूस्टर डोस'! या सोप्या ट्रिक्समुळे तुमचा फोन होईल रॉकेटपेक्षा वेगवान."

​"मोबाईलला द्या 'बूस्टर डोस'! या सोप्या ट्रिक्समुळे तुमचा फोन होईल रॉकेटपेक्षा वेगवान."


आज जग जणू स्मार्टफोनवर आलंय. किराण्यापासून ते दुधापर्यंत सर्व वस्तू स्मार्टफोनमधील प्लॅटफॉर्मवरून मागवता येतात. तर त्याचे ऑनलाईन पेमेंटही करता येते.

इतकेच पार अमेरिकेतील मित्राला व्हॉट्सॲपवर गप्पा मारता येतात. सोशल मीडियावर जुने मित्र हुडकता येतात. त्यांच्या जीवनातील घडामोडी जाणून घेता येतात. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने त्याचा वेग मंदावला आहे. अशावेळी अनेक जण तो रिस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. दीर्घ प्रवासाचा क्षीण घालवण्यासाठी जसे आपण ताणून देतो. तसेच फोनला सुद्धा आरामाची गरज असते. रिस्टार्ट केल्याने खरंच स्मार्टफोन रिफ्रेश होतो का? त्याची कामगिरी सुधारते का?

स्मार्टफोन करा रीस्टार्ट

अनेकांच्या मनात येते की स्मार्टफोन रिस्टार्ट करावा की नाही? जर तुमचा मोबाईल अचके देत असेल. त्याचा वेग मंदावला असेल अथवा तासनतास गेम खेळत असाल, त्यावर एडिटिंगचे काम करत असाल तर मोबाईलला एकदा रिस्टार्ट जरूर करा. त्यामुळे कॅची फाईल्स आणि इतर फाईल्सचा अडथळा दूर होतो. पण फोन रोज रीस्टार्ट करण्याची गरज नाही. पण जर तुमचा फोनचा अतिवापर असेल अथवा तुम्ही त्यावर गेम खेळत असाल, व्हिडिओ एडिटिंग अथवा सोशल सफरिंग करत असाल तर मात्र तुम्ही दोन ते तीन दिवसाआड फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे.

काय आहे गोल्डन रूल?

अनेक टेकतज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी मोबाईल रिस्टार्ट करणे सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे फोनची टेम्पररी मेमरी (RAM) संपूर्ण रित्या स्वच्छ होते. छोटे वा खतरनाक बग्स, जे सिस्टिम स्लो करतात ते नष्ट होतात. याप्रकारामुळे वारंवार फोन बंद करण्याची गरज भासणार नाही. तुमच्या फोनचा स्पीड वाढेल. तो शक्तिमान होईल आणि लोण्यासारखा काम करेल. तुम्हाला मोबाईल वापरताना अडचण येणार नाही. अर्थात तुमचा इंटरनेटचा स्पीडही चांगला असायला हवा.

ज्याचा वापर कमी त्याने काय करावं?

जर तुमचा स्मार्टफोनचा वापर अत्यंत कमी असेल. फोन केवळ कॉल्स आणि मॅसेजसाठी वापर असाल तर महिन्यातून एकदा स्मार्टफोन रीस्टार्ट करणे हा चांगला पर्याय आहे. पण असे युझर्स बोटावर मोजण्या इतके आहेत. कारण आज सोशल मीडियाच्या मायाजाळात प्रत्येक जण रील्स पाहतो अथवा गेम्स खेळतो. त्यामुळे तुमच्या मोबाईलला ही क्षणिक विश्रांतीची गरज आहे हे ओळखा, तरच तो दीर्घकाळ चांगली कामगिरी करेल.

बोनस टिप: जर तुमचा फोन खूपच जुना असेल, तर फोनमधील 'Animations' बंद केल्याने देखील फोन अधिक वेगवान वाटू लागतो!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.