Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- कवठेपिरान हादरले! दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा गेम; डोक्यात वार करून निघृण खून, थरारक पाठलागानंतर आरोपी गजाआड

सांगली :- कवठेपिरान हादरले! दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा गेम; डोक्यात वार करून निघृण खून, थरारक पाठलागानंतर आरोपी गजाआड


कवठेपिरानमध्ये दारूच्या कारणातून तरुणाचा निर्घण खून : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरदुपारी तरुणाचा दारू पाजण्यावरून झालेल्या वादातून निघृण खून करण्यात आला. सदरची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन सुभाष पाटील (वय 36) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर घराला कुलूप लावून पसार झालेल्या संशयित जगन्नाथ उर्फ सोन्या विलास भोसले (वय 40 रा. कवठेपिरान) याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन तासात गजाआड केले. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

डोक्यात केले वार : संशयित खोराला पाठलाग करून पकडले. याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत सचिन पाटील हा मोलमजुरी करून कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये राहत होता. संशयित हल्लेखोर भोसले हा गावात राहण्यास आहे. त्याचे आई-वडिल शेतातील घरात राहण्यास आहेत.

संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती. तो मोलमजूरीचे काम करतो. जगन्नाथ आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ उर्फ सोन्या आणि सचिन पाटील हे दोघेजण जगन्नाथ याच्या घरी दारू पीत बसले होते. यावेळी दोघांमध्ये तत्कालीन कारणावरून वाद झाला.
या वादातून जगन्नाथ याने अज्ञात हत्याराने डोक्यात निघृण वार करून त्याचा खून केला. रक्ताच्या थोराळ्यात पाटील पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती. तो मोलमजूरीचे काम करतो. जगन्नाथ आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ उर्फ सोन्या आणि सचिन पाटील हे दोघेजण जगन्नाथ याच्या घरी दारू पीत बसले होते. यावेळी दोघांमध्ये तत्कालीन कारणावरून वाद झाला.

या वादातून जगन्नाथ याने अज्ञात हत्याराने डोक्यात निघृण वार करून त्याचा खून केला. रक्ताच्या थोराळ्यात पाटील पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत, पोलिस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. याठिकाणी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते.
संशयित जगन्नाथ भोसले हा घटनेनंतर गावातील एकाची दुचाकी घेऊन निघाला. दुधगावसह परिसरातून तो निघाला. त्यानंतर अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानंतर पथकाने छापेमारी करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.