Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! भाजपला घरचा आहेर! "लोकांमध्ये प्रचंड नाराजी, सत्ता काँग्रेसचीच येणार!" भाजपा महिला आमदाराच्या व्हायरल ऑडिओने राजकीय वर्तुळात खळबळ!

Big Breaking! भाजपला घरचा आहेर! "लोकांमध्ये प्रचंड नाराजी, सत्ता काँग्रेसचीच येणार!" भाजपा महिला आमदाराच्या व्हायरल ऑडिओने राजकीय वर्तुळात खळबळ!


छत्तीसगडमधीलभाजपा नेत्या आणि आमदार रेणुका सिंह यांच्या व्हायरल झालेल्या एका कथित ऑडियोमुळे खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमधील भरतपूर-सोनहत विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या रेणुका सिंह यांचे दोन ऑडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये रेणुका सिंह या स्वत:च्याच सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत.

व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये रेणुका सिंह काय म्हणाल्या?
या संदर्भातील व्हायरल ऑडियोमधून रेणुका सिंह ह्या प्रशासकीय कामकाज आणि संघटनेच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही त्या नाराजी व्यक्त करत असल्याचे ऑडियोमधून ऐकू येत आहे. हा ऑडियो समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडीओ भाजयुमोचे नेते मनोज साहू यांनी व्हायरल केला आहे. आता त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे.

एवढंच नाही तर रेणुका सिंह ह्या व्हायरल ऑडियोमध्ये राज्यातील सरकार वरून चालवलं जात आहे. कुणालाही मुख्यमंत्री बनवून त्वरित हटवता येत नाही. मात्र वरिष्ठ पातळीवरील लोकही फारसे समाधानी नाही आहेत. राज्यात पुन्हा एकदा भूपेश बघेल यांचं पुनरागमन होईल. तसेच ते काँग्रेसचे मुख्यमंत्री बनतील आणि यांना तुरुंगात पाठवतील, असेही सांगताना दिसत आहेत.
रेणुका सिंह यांनी दिलं असं स्पष्टीकरण

दरम्यान, या व्हायरल होत असलेल्या ऑडियोबाबत रेणुका सिंह यांनी स्पष्टीकरण देत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ऑडियोमध्ये ऐकू येत असलेला आवाज हा माझा आवाज नाही. तर एआय द्वारे तयार केलेला आणि बनावट आहे. मी माझ्या मुलावरील उपचारांसाठी मुंबईत आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.