'धुरंधर'ला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानात बनवला 'मेरा ल्यारी'; पण चित्रपटगृहात प्रेक्षकांनी फिरवली पाठ, तिकिटांची विक्री पाहून बसेल धक्का!
‘धुरंधर’ हा सिनेमा डिसेंबर २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमात पाकिस्तानमधील काही ठिकाणांचा उल्लेख केला होता. भारतीय गुप्तहेर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर काय गोष्टी घडतात, रेहमान डकैत, ल्यारीमधील सत्तेसाठीचा संघर्ष, भारताविरुद्ध केली जाणारी कारस्थाने धुरंधरमध्ये पाहायला मिळाली. धुरंधर २ हा सिनेमा मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्येही ल्यारी हे ठिकाण पाहायला मिळाले. आता पाकिस्तानमध्ये असा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्याचे नाव मेरा ल्यारी असे आहे.
‘धुरंधर’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानात बनवला ‘मेरा ल्यारी
पाकिस्तानमध्ये मेरा ल्यारी हा सिनेमा ८ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे. सिनेमात ल्यारीचे सकारात्मक चित्रण केले आहे. त्यामध्ये तेथील दैनंदिन जीवन, महिलांचा फुटबॉल हा खेळ दाखविण्यात आला आहे. हे शहर कराचीजवळ आहे. ल्यारीबद्दल नकारात्मक गोष्टी जगासमोर आल्या आहेत. या सिनेमात तेथील चांगल्या गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.जरी ल्यारीबद्दल लोकांना सकारात्मक गोष्टी समजाव्यात, ल्यारीची दुसरी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळावी, या दृष्टीने हा सिनेमा बनवला गेला असला तरी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत नाही. सिनेमाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यासाठी हा सिनेमा अपयशी ठरत आहे. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार, अगदी सुरुवातीपासून सिनेमाची कमाई अगदी कमी होत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील काही थिएटरमधील लवकरच ‘मेरी ल्यारी’चे शो बंद होणार आहेत.
पाकिस्तानमधील स्थानिक रिपोर्टनुसार, ‘मेरी ल्यारी’ची फक्त २२ तिकिटे विकली गेली आहेत. त्यातूनच प्रेक्षकांचा अगदीच कमी प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एका दिवसात या सिनेमाचे स्क्रीनिंग बंद केले आहे. त्याऐवजी ज्या चित्रपटांना प्रेक्षक गर्दी करत आहेत, ते सिनेमे दाखविले जात आहेत.
अबू अलीहा दिग्दर्शित या चित्रपटात आयेशा ओमर, दानानीर मोबीन, सामिया मुमताज व ट्रिनेट लुकास यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘धुरंधर’ चित्रपट हेरगिरी आणि दहशतवादावर आधारित एक उत्कंठावर्धक स्पाय थ्रिलर म्हणून सादर झाला आहे. तर, ‘मेरी ल्यारी’ मात्र एक पूर्णपणे वेगळा मार्ग अवलंबतो, जो खेळ, सामुदायिक भावना आणि ल्यारीमधील तरुण महिला फुटबॉलपटूंच्या जीवनावर केंद्रित आहे.
अबू अलीहा दिग्दर्शित या चित्रपटात आयेशा ओमर, दानानीर मोबीन, सामिया मुमताज व ट्रिनेट लुकास हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. धुरंधर या सिनेमात हेरगिरी व दहशतवादावर आधारित गोष्ट पाहायला मिळते. हा स्पाय थ्रिलर सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे; तर मेरी ल्यारी हा पूर्णपणे वेगळ्या जॉनरचा सिनेमा आहे. त्यामध्ये खेळ, एकोपा आणि ल्यारीमधील तरुण फुटबॉलपटूंच्या जीवनावर केंद्रित हा सिनेमा आहे.
मेरी ल्यारी सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच सिनेमाला राजकीय पाठिंबा मिळाला होता. ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, सिंधचे मंत्री शरजील इनाम मेमन यांनी सिनेमाला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. तसेच, भारतातून येणाऱ्या नकारात्मक प्रचाराला हे उत्तर असल्याचे म्हटले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक अबू अलीहा यांनी यापूर्वी चित्रपट शक्य तितका वास्तववादी ठेवण्याचा हेतू असल्याचे सांगितले. तसेच, या सिनेमात स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचेदेखील सांगितले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.