Big Breaking! "महाराष्ट्र महिला आयोगाला मिळणार 'लेडी सिंघम'ची साथ; मीरा बोरवणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब?"
मुंबई : आपल्या धडाकेबाज आणि निडर कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. पोलीस दलातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आता राज्यातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी होणार आहे.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकतेमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रूपाली चाकणकर यांच्यानंतर हे पद माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य महिला आयोगाच्या अधयक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांना विचारणा झालेली आहे.
मीरा बोरवणकर यांनाच अध्यक्षपदी नेमा, अनेकांची मागणी महिलांचे हक्क, सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीने महिला आयोग अत्यंत महत्त्वाचे कार्य करू शकतो. महिला आयोगाचे अध्यक्षपद हे एक संवैधानिक, कायदेशीर पद आहे जे महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी थेट हस्तक्षेप करू शकते. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये 'सुमोटो' अर्थात स्वतःहून दखल घेण्याचा अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्षांना आहे. मीरा बोरवणकर यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांचा विचार करावा, अशी मागणी अनेक नेत्यांनी लावून धरली होती. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अनेकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांचे नाव सुचवले आहे.
वडील बीएसएफमध्ये, पती आयएएस, किरण बेदींपासून प्रेरणा घेऊन आयपीएस अधिकारी बनल्या, कोण आहेत मीरा बोरवणकर? मीरा बोरवणकर या भारतीय पोलीस सेवेतील अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांचे नाव महाराष्ट्रातील सर्वोत्तम IPS अधिकार्यांमध्ये घेतले जातेच, पण त्या देशभरात 'सुपरकॉप' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना 'लेडी सिंघम' असेही म्हणतात. मुंबईतील माफिया राजवट संपवण्यात मीरा बोरवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी अंडरवर्ल्डमध्येही आपली दहशत निर्माण केली होतीमीरा बोरवणकर या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. बोरवणकर १९८१ बॅचच्या निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील ओ.पी. चढ्ढा हे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) होते. त्यांची पोस्टिंग फाजिल्का येथे होती, त्यामुळे मीरा यांनी १० वी पर्यंतचं शिक्षण तिथूनच पूर्ण केले. १९७१ मध्ये वडिलांची बदली झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जालंधर येथून घेतले. त्यांचे पती अभय बोरवणकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. निवृत्त माजी आयपीएस किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या.
अशोक खरात याच्याशी विशेष जवळीक, रुपाली चाकणकरांना द्यावा लागला राजीनामा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली विशेष जवळीक तसेच त्याच्या मंदिराच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर या सदस्य असल्याने त्यांची सलगी अधोरेखित होत होती. महिला अत्याचारासारखा गंभीर गुन्ह्याविषयी आरोप झाल्याने राज्यातल्या सर्वच क्षेत्रातून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. अखेर चाकणकर यांनी राजीनामा देऊन त्यांच्याशी संबंधित चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.