Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुश्रीफांचे साम्राज्य खालसा! 'गोकुळ'वर फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक; अखेर प्रशासक बसलाच!

मुश्रीफांचे साम्राज्य खालसा! 'गोकुळ'वर फडणवीसांचा सर्जिकल स्ट्राईक; अखेर प्रशासक बसलाच!


कोल्हापूर :- गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाचे राजकारण उफाळून आले आहे. दूध संघावर प्रशासक नको अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संचालक मंडळाने घेतली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक नको म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या संचालक मंडळाला अखेर मुख्यमंत्र्यांनी चांगलाच धक्का दिला आहे.

फडणवीस यांनी, गोकुळ दूध संघाच्या प्रशासक पदाचा कारभार एका अधिकाऱ्यावर न सोपवता या प्रशासक मंडळावर तब्बल पाच जणांची नियुक्ती केली आहे. या संदर्भाचे अध्यादेश आज विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिले. तर प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांची नियुक्ती केली आहे.
गोकुळच्या या प्रशासक मंडळावर सातारा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष, कोल्हापूर चंदगडमधील सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, पुणे येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, लेखापरीक्षक सागर बलकवडे व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख चंद्रकांत परुळेकर यांचे या प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

दरम्यान गोकुळ दूध संघावर प्रशासक नको या मागणीसाठी आज काही संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे समजते. मात्र तत्पूर्वीच या संदर्भातील आदेश गोकुळ प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. आज संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने उद्यापासून गोकुळ दूध संघावर प्रशासक राज सुरू होणार आहे.

गेल्या पाच वर्षात गोकुळ दूध संघावर लेखापरीक्षण, विविध योजनेतील अपहार, भ्रष्टाचार, निवडणुकीसाठी सभासद वाढवलेल्या बोगस दूध संस्था असे आरोप होत आलेले आहेत. त्या संदर्भात अनेक तक्रारी गोकुळकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती.
30 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्किट बेंच ने जोपर्यंत तेराशे आठ संस्थांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निकाल दिल्यानंतर गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज त्या संदर्भातील आदेश प्राप्त झाले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.