Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता ६०% झाला; जानेवारी २०२६ पासूनची थकबाकीही मिळणार"

​"सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता ६०% झाला; जानेवारी २०२६ पासूनची थकबाकीही मिळणार"


मुंबई : केंद्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर राज्य सरकारनेही महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे.

महागाई भत्त्यात वाढ, किती पगार वाढणार?

राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. आता त्यामध्ये २ टक्क्यांची भर पडल्याने हा भत्ता ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.या वाढीव महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात पदनिहाय आणि वेतन श्रेणीनुसार मोठी वाढ दिसून येईल. वाढत्या महागाईचा विचार करता कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात होती, ज्याचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारने महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला.

शासन निर्णयात काय म्हटले आहे?
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०१/२०२६ पासून लागू करण्यात आलेला २% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०१/२०२६ पासून ६० % दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

महागाई भत्त्यात किती वाढ- २ टक्के
आधी महागाई भत्ता किती मिळत होता- ५८ टक्के
नवीन महागाई भत्ता किती मिळणार- ६० टक्के



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.