Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? गॅस सिलेंडरच्या किमतींबाबत दिल्लीत मोठी बैठक

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री? गॅस सिलेंडरच्या किमतींबाबत दिल्लीत मोठी बैठक


इराण आणि अमेरिका युद्धात स्थिती भयंकर आहे. कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा देखील आहे. राज्यात एक महिना पुरेस इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक आहे. काही भागात पेट्रोल आणि डिझेलकरिता मोठ्या रांगा पेट्रोल पंपाबाहेर लागल्या आहेत. 
इराण आणि अमेरिका युद्धाचा थेट परिणाम भारतात बघायला मिळत आहे. दोनदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. महागाईमध्ये मोठी वाढ झाली. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी आणि त्यानंतर 19 मे रोजी 90 पैशांनी दरवाढ करण्यात आली. दुसरीकडे एलपीजी गॅसच्याही किमती वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा या युद्धामुळे झाला. व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ सरकारकडून अगोदरच करण्यात आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कधीही वाढ होऊ शकते.
मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या कितमीमध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात करण्यात आली होती. इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ होत असताना सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणीतीही वाढ केली नाही. आता आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडत आहे, या बैठकीत एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीबद्दल निर्णय होऊ शकतो.
कोणत्याही क्षणी एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाने प्रति बॅरल 109 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अंदाजे 3.90 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर घरगुती एलपीजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई आणि वाढत्या इंधन दरांवर चर्चा होऊ शकते.
जर पुढील काही दिवसात इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर परिस्थिती अधिक बिकड होऊ शकते. जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमती गगणाला पोहोचताना दिसत आहेत. शिवाय होर्मुज खाडीही बंद आहे. काही दिवस पुरेल इतकाच भारताकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा शिल्लक आहे. यादरम्यानच भारत सरकारकडून मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.