Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तैवानमध्ये भारताच्या विरोधात संतापजनक प्रकार! रस्त्यांवर लागली थेट भारतविरोधी पोस्टर्स, भारतीय मजुरांना हाकलण्याची मागणी!

तैवानमध्ये भारताच्या विरोधात संतापजनक प्रकार! रस्त्यांवर लागली थेट भारतविरोधी पोस्टर्स, भारतीय मजुरांना हाकलण्याची मागणी!


तैवानमध्ये सध्या स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीचा प्रचार करताना एका अपक्ष उमेदवाराने भारत विरोधी पोस्टर्स लावले आहे. या पोस्टरमध्ये पगडी घातलेल्या एका शीख व्यक्तीच्या चित्रावर 'नो' म्हणजे बंदीचे चित्र छापले आहे.
भारतातून येणाऱ्या स्थलांतरित मजुरांना विरोध करावा आणि त्यांना देशाबाहेर हाकलून दिले जावे, असा स्पष्ट संदेश यातून दिला आहे. तसेच तैवानमधील विरोधी पक्ष पुओमिनतांगसुद्धा भारतीय मजुरांना देशात येण्यास विरोध करत आहे. 
खासदार हुआंग चिएन-पिन यांनी भारताच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटले की, भारतीय मजुरांबाबत अधिक कठोर तपास आणि पाळत ठेवायला हवी. ते तैवानमध्ये महिलांवर बलात्कार करू शकतात. तैवानमधील एका हिंदुस्थान नागरिकाने सोशल मीडियावर याला वर्णद्वेषी भेदभाव म्हटले आहे. एखाद्या धोरणाला विरोध करणे वेगळी गोष्ट आहे, परंतु एखाद्या समुदायाच्या ओळखीला आणि सांस्पृतिक प्रतीकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.