Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जालन्यात राडा! गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांनी ओतली शाई; जोरदार घोषणाबाजी

जालन्यात राडा! गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांनी ओतली शाई; जोरदार घोषणाबाजी


जालन्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे जालना शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे ज्या गाडीत शाई फेकण्यात आली, त्या गाडीत सदावर्ते यांच्या पत्नी आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली. गुणरत्न सदावर्ते हे आज जालना दौऱ्यावर आले असताना काही मनसैनिकांनी त्यांच्या वाहनाला लक्ष्य केले.

या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे  यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच चंदनझिरा पोलिसांनी मनसेच्या पाच ते सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षाचालकांच्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे  यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.