रक्षकच बनला भक्षक! पुण्यात ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; उच्भर सोसायटीच्या वॉचमनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील नसरापूर, पर्वतीभागातील घटना ताजी असताना पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका सुरक्षारक्षकाने संतापजनक प्रकार केल्याचे समोर आलं आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत हा संतापजनक प्रकार घडला. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षारक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झालाय.मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत शांतता असताना शुक्रवारी दुपारी आरोपी दिनेश याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवलं. त्यानंतर त्यांना सातव्या मजल्यावर नेलं. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय.टेरेसवरील प्रकार कोणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली होती. आरोपी सुरक्षारक्षकाच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने हिंमत न हारता घरी पोहोचताच आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.