Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा; सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात अभिवादन​

सांगलीत राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा; सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात अभिवादन


सांगली: आरक्षणाचे जनक आणि लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथील आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाहू महाराजांनी शिक्षण, शेती आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीकारी कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला. 
त्यांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. ​या कार्यक्रमाला नगरसेविका योगिताताई राठोड, मंडलध्यक्ष रविंद्र वादवणे, अमित देसाई, राजू जाधव, अमर पडळकर, किरण कपाले, प्रशांत राठोड, राजू पठाण, गौस पठाण, भालचंद्र बक्षी, श्रीधर जाधव, आबा जाधव, अक्षय काळे, बापू सोनावणे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.