पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ते बनले आहेत. बंगालचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या विविध नेत्यांनी उपस्थिती लावली होती. अधिकारी यांची काल विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती.
या नेत्यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
दिलीप घोषअग्निमित्रा पॉलअशोक कीर्तनियाखुदिराम टुडूनिसीथ प्रमाणिकममतांना केले पराभूतपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बॅनर्जी यांना आपली भवानीपूर जागा राखण्यात अपयश आले. या जागेवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला.निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांनी पराभव केला. सुवेंदू यांनी नंदीग्राममधूनही निवडणूक लढवली होती, तिथेही ते विजयी झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.