Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच प्रकाश राज यांचा 'वॉशिंग मशीन' तंज; पंतप्रधान मोदींच्या जुन्या व्हिडीओमुळे खळबळ."

"बंगालमध्ये भाजपचे सरकार येताच प्रकाश राज यांचा 'वॉशिंग मशीन' तंज; पंतप्रधान मोदींच्या जुन्या व्हिडीओमुळे खळबळ."


पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच राजकीय आणि मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यातच अभिनेते प्रकाश राज यांनी सुवेंदू अधिकारींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षे जुना व्हिडीओ शेअर करत भाजपची खिल्ली उडवली आहे.

प्रकाश राज यांनी X वर हा व्हिडीओ शेअर करत भाजपला 'वॉशिंग मशीन' म्हटले आहे.

प्रकाश राज यांनी आपल्या X अकाउंटवर जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये दोन व्हिडीओ एकत्र करण्यात आले आहेत. एका बाजूला सुवेंदू अधिकारी एका वृत्तपत्रात गुंडाळलेली काहीतरी वस्तू (लाच) खिशात ठेवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कथित नारद स्टिंग ऑपरेशन दरम्यानचा आहे. जेव्हा सुवेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मंत्री होते आणि त्यांना कॅमेऱ्यावर लाच घेताना पकडल्याचा दावा करण्यात आला होता. तर व्हिडीओच्या दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका करताना आणि त्यांना भ्रष्ट म्हणताना दिसत आहेत.

पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ १० वर्षांपूर्वीचा असून, त्यामध्ये त्यांनी टीएमसीवर निशाणा साधला होता. व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की, "चेहरा किती निष्पाप वाटत आहे, पण असे वाटते की, ही यांची रोजचीच सवय आहे. काही लोक तर कॅमेऱ्यासमोर विचारत आहेत की, एवढे कमी का आणले?" हाच धागा पकडून प्रकाश राज यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

याआधी प्रकाश राज यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी ४४ सेकंदांचा एक व्हिडीओ री-पोस्ट केला असून त्यासोबत "वाव वाव वाव… काय गर्दी आहे!" असे लिहित हसण्याचे इमोजी वापरले आहेत. या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला पंतप्रधान मोदींचे कटआउट्स लागलेले दिसत असून, हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील असल्याचे बोलले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.