देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत ७००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून इच्छुकांनी अर्ज करता येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
स्टेट बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ७१५० पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी https://sbi.bank.in/web/careers/current-openings वर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत https://apprenticeshipindia.org https://nsdcindia.org/apprenticeship या वेबसाइटवर जाऊनदेखील अर्ज करु शकतात. स्टेट बँकेची ही सर्वात मोठी भरती आहे. याआधी २०२३ मध्ये ६००० पदांसाठी अप्रेंटिस भरती काढली होती.
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाणार आहे. उमेदवारांना स्थानिक भाषेची परीक्षा द्यावी लागणार आहे. उमेदवाराला स्थानिक भाषा लिहता,वाचता यायला हवी. जर त्यांना स्थानिक भाषा येत नसेल तर त्यांची निवड केली जाणार नाही.
स्टेट बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांमधील असावी. या नोकरीसाठी सर्वात आधी लेखी परीक्षा, त्यानंतर लँग्वेज टेस्ट, कागदपत्र पडताळणी होणार आहे. यामध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना काम करता येणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी sbi.co.in वर जा.
यानंतर होमपेजवर करिअर ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.
यानंतर अप्रेंटिस भरती संबंधित लिंकवर क्लिक करा. फॉर्म भरा.
यानंतर शुल्क सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.