Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता हॉटेल अन् मेडिकल माफियांची खैर नाही! फडणवीसांच्या 'त्या' मास्टरस्ट्रोकनंतर तुकाराम मुंढेंची दणक्यात एन्ट्री!

आता हॉटेल अन् मेडिकल माफियांची खैर नाही! फडणवीसांच्या 'त्या' मास्टरस्ट्रोकनंतर तुकाराम मुंढेंची दणक्यात एन्ट्री!

मुंबई: गेली दीड महिन्याच्या प्रतिक्षेनंतर तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.दिव्यांग कल्याण विभागात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या मुंडे यांनी दिव्यांग कल्याणच्या नावाखाली सरकारची निधीची होणारी लूट थांबवितांना अनेक बोगस दिव्यांग कल्याण संस्थांवर कारवाईची बडगा उगारला होता.

मुंडे यांच्या या कारवाईने हवादील झालेल्या संस्थाचालकांनी सरकारमधीलच काही मंत्र्यांना हातीशी धरून मुंडे यांची बदली घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. दिव्याग कल्याण मधून उडलबांगडी गेल्यानंतर मुंडे यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मात्र तेथील विद्यमान प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी आपले राजकीय वजन वापरुन आपली बदली रोखण्यात यश मिळविले होते. नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनात मदत आणि पुनर्वसन विभागाची जबाबदारी महत्वाची ठरणार आहे. या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून येणारा हजारो कोटींचा निधी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या माध्यमातूनच कुंभमेळ्यासाठी खर्च होणार आहे. अशावेळी मुंडे यांचा आजवरचा पारदर्शी कारभार लक्षात घेतल्यास कुंभमेळ्याच्या कामात मुंडे यांची अडचण ठरण्याच्या धास्तीने मुंडे यांची मदत आणि पुनर्वनस विभागात झालेली बदली रद्द करण्यात आल्याचे सांगितले जाते. मुंडे यांच्यासाठी सरकारने नव्या पदाचा शोध सुरु केला होता. गेले दीड महिना मुंढे नव्या पदाच्या प्रतिक्षेत होते.

दिव्यांग कल्याण विभागातील बोगस संस्थांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे नाराज झालेल्या संस्थाचालकांनी मुंढे यांच्या बदलीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. दिव्यांग कल्याण संस्थालकांच्या दबाबानंतर सरकारने मुंढे यांनी बदली केली होती. त्यानंतर गेले दीड महिने नव्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंढे यांची आता अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

कान्हुराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर श्रीधर डुबे यांची नियुक्ती मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. तसेच राज्य कामगार विमा योजना आयुक्त आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून बाबासाहेब बेलदार यांची धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.