Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतापजनक! सांगलीतील 'बळीराजा वॉटर पार्क'मध्ये पर्यटकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल!

संतापजनक! सांगलीतील 'बळीराजा वॉटर पार्क'मध्ये पर्यटकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल!


सांगली (मालगाव): उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाला सांगलीतील मालगाव येथील 'बळीराजा वॉटर पार्क'मध्ये अत्यंतj भीषण आणि संतापजनक अनुभवाचा सामना करावा लागला. महिला पर्यटकासमोर कर्मचाऱ्याने केलेल्या अश्लील आणि घाणेरड्या कृत्याचा जाब विचारला असता, वॉटर पार्कच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांनी संबंधित पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी मॅनेजरसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अंकलखोप येथील अमोल अशोक चौगुले हे आपल्या कुटुंबासह २ मे रोजी मालगाव येथील बळीराजा वॉटर पार्कमध्ये पर्यटनासाठी गेले होते. दुपारी चौगुले यांच्या पत्नी एका बाजूला बसल्या असताना, निरंजन नावाचा कर्मचारी त्यांच्या समोर आला आणि त्याने तिथेच उलटी केली. या घाणेरड्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अमोल चौगुले यांनी तत्काळ मॅनेजरकडे धाव घेत तक्रार केली.
​"उलटी करायची आमची पद्धतच आहे!" मॅनेजरची मुजोरी

तक्रार ऐकून घेण्याऐवजी वॉटर पार्कच्या मॅनेजरने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले. "आम्हाला काही सांगायचं नाही, उलटी करायची आमची पद्धतच आहे, तुला काय करायचे ते कर!" असे म्हणत मॅनेजरने थेट आव्हान दिले. एवढ्यावरच न थांबता, मॅनेजर आणि इतर चार ते पाच कामगारांनी अमोल चौगुले यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

​पोलिसांची कडक कारवाई
या राड्यानंतर अमोल चौगुले यांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत मॅनेजरसह एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वॉटर पार्कच्या नावाखाली पर्यटकांना मारहाण आणि महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, अशा मुजोर वॉटर पार्क व्यवस्थापनावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.