एसीच्या स्फोटाने राजधानीत तांडव: ४ मजल्यांवर पसरली आग, ९ जणांचा दुर्दैवी अंत
नवी दिल्ली: राजधानीत रविवारी भल्या पहाटे एका भीषण आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील शाहदारा येथील विवेक विहार येथे असलेल्या चार मजली इमारतीला रविवारी, 3 मे रोजी, भीषण आग लागली.
या आगीत इमारतीतील 9 जणांचा मृत्यू झाला असून इतर काही रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही आग इमारतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटपर्यंत पसरली होती.
नेमकं काय घडलं?
पूर्व दिल्लीतील विवेक विहार परिसरात भीषण आग लागल्याची माहिती पहाटे 3.47 वाजता अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 14 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी दाट धूर आणि ज्वाला वेगाने पसरत होत्या. पण अग्निशमन दलाच्या बचावकार्यादरम्यान 10 ते 15 रहिवाशांना इमरातीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. पण 9 जणांचा या दुर्घटने मृत्यू झाला आहे. जखमींपैकी काही जणांना किरकोळ इजा झाली आहे. दोन जणांना गंभीर इजा झाली असून त्यांना उपचारासाठी गुरु तेग बहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, इमारतीतील एका एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.
एसीतील स्फोटामुळे आग
रात्रभर एसी सुरू असताना इमारतीतील बॅल्कनीत असेलेल्या एसीच्या मशीनमध्ये स्फोट झाला असल्याचे चित्र दिसत आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावर या आगीचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आग परसण्यापासून थांबवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या विवेक विहार परिसरात तैनात करण्यात आल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात दलाला यश मिळालं.
इमारतीतील रहिवासी रोहित या घटनेबद्दल बोलताना सांगितले,"एसीच्या स्फोटामुळे ही आग लागली आहे. सुमारे 12 -15 रहिवाशांना वाचवण्यात यश आले आहे. रविवारी पहाटे 3.13च्या सुमारास इमारतीला आग लागली असून 3.35च्या सुमारास अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. प्राथमिक अंदाजानुसार एसी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. तरी अधिकारी अजून पुढील तपास करत आहेत."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.