मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला केवळ प्रतिसाद न देता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपला आलिशान गाड्यांचा ताफा बाजूला सारून मुख्यमंत्री चक्क बुलेटवरून विधानभवनात दाखल झाले.
अनोखी एन्ट्री: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार आशिष शेलार यांच्यासोबत बुलेटवर स्वार होऊन विधानभवनात पोहोचले.इलेक्ट्रिक वाहनाचा वापर: इंधन बचतीचा ठोस संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी इलेक्ट्रिक बुलेटचा वापर केला. त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी असलेला ताफाही दुचाकींवरच होता.आदर्श पाऊल: कालच झालेल्या बैठकीत फडणवीसांनी मंत्र्यांना इंधन बचतीचे निर्देश दिले होते. त्यानंतर २४ तासांच्या आत त्यांनी स्वतः कृती करून नवा आदर्श घालून दिला आहे.शिंदेंचीही साथ: केवळ फडणवीसचं नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कालपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे."पंतप्रधानांच्या आवाहनानंतर राज्याच्या नेतृत्वाने प्रत्यक्ष कृतीतून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.मुख्यमंत्र्यांच्या या 'इलेक्ट्रिक' अवताराने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सर्वसामान्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.