Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवघे ६,६०० रुपये अन् १८ मृत्यू! पुण्याचे विषारी दारूकांड; वाचाल तर अंगावर काटा येईल!

अवघे ६,६०० रुपये अन् १८ मृत्यू! पुण्याचे विषारी दारूकांड; वाचाल तर अंगावर काटा येईल!


पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे विषारी दारू प्यायल्यामुळे 18 लोकांचा जीव गेला असून यामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली आहे. पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडीत काल विषारी दाऊ पिऊन आठ जणांचा सुरुवातीला मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर हडपसर येथेही पाच जणांचा विषारी दारुने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. राज्याला हादरवणाऱ्या या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. याविरोधात पुण्यात आज युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे गुलाबी गँगही रस्त्यावर उतरली आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला.विषारी दारू विक्रेत्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, मृतांच्या कुटुंबियांना न्याय व आर्थिक मदत द्यावी. महिलांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारू माफियांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान या विषारी दारूकांडाप्रकरणी आत्तपर्यंत अनेकांना अटक करण्यात आली असून मिथेनॉल युक्त ही दारू ज्याने विकली तो योगेश वानखेडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. योगेश याने अवघ्या काही हजार रुपयांच्या मोहापायी अनेकांच्या जीवाशी खेळ केला आणि ती दारू पिऊन कित्येक लोकांना जीव गमवावा लागला.

6600 रुपयांसाठी त्याने घेतला 18 जणांचा बळी

विषारी दारूकांडप्रकरणी हादरवणारी माहिती समोर आली आहे. आरोपी योगेश वानखेडे हा दारू वितरीत करण्याचं काम करत होता. मात्र दारूचं वितरण करत असतानाच तो मध्येच गाडी थांबवून त्याने दारूत मिथेनॉल मिसळलं होतं, असं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मिथेनॉल आणि दारू खरेदी करण्यासाठी योगेशने केलेला खर्च आणि त्याने मिथेनॉल मिक्स करुन विक्री केलेली दारू याचा हिशोब करून फरक काढला, तर त्याला 6600 रुपयांचा फायदा झाला.

कसं ते आपण सविस्तर जाणून घेऊया..
– आरोपी योगेश वानखेडेने 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं – त्यासाठी त्याने 17500 रुपये मोजले. त्याने 9 मे रोजी ही खरेदी केली.

– त्याने 23 मे रोजी मिथेनॉलचा प्रयोग करायचं ठरवलं होतं. त्यानुसार, त्याने 35 लिटरचा 1 ड्रम , ज्यासाठी 1900 रुपये लागतात, असे 5 ड्रम खरेदी केले. एकूण पैसे लागले 9500 रुपये.

– नंतर योगेश वानखेडे याने 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी मिक्स करून एकूण 10 ड्रम बनवले.

– आणि याच 10 ड्रममध्ये त्याने निम्म्याहून अधिक मिथेनॉल मिक्स केलं आणि त्याचे 12 ड्रम बनवले.

– त्यामुळे मिथेनॉलचे 17500 रुपये अधिक 5 ड्रम दारुचे 9500 = असा एकूण 27000 रुपये खर्च त्याला आला.

– योगेश याने प्रति ड्रम 2800 रुपये प्रमाणे विकला. त्याने एकूण 12 ड्रमची विक्री केली, ज्यातून त्याला 33 हजार 600 रुपये मिळवले.

– या संपूर्ण खरेदीसाठी झालेला खर्च आणि दारूच्या विक्रीतून मिळालेले पैसे यातील फरक मोजायचा झाला तर 33600 रुपये – 27500 = उरले 6 हजार 600 रुपये.

म्हणजेच योगेश वानखेडे याला 6600 रुपयांचा फायदा झाला.
विषारी दारूप्रकरणात सीआयडीची एंट्री

पुणे-पिंपरी विषारी दारू मुळे आतापर्यंत 18 लोकांचा बळी गेला असून र आणखी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.दरम्यान सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी मध्ये झालेले मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्या दापोडी पोलीस स्टेशन मधील दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दापोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि तपास पथकाचे इंचार्ज तसेच चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं . तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी कडे गेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोंढवा बुद्रुकमध्ये रुग्णालयासमोर दारूचे फुगे
पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात दारूचे रिकामे फुगे पडलेले असतात. संबंधित रुग्णालयाच्या परिसरात आणि आसपासच्या भागात हातभट्टीच्या दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायामुळे अनेक जण परिसरात मद्यपान करताना दिसतात. विशेष म्हणजे रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणाच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्यांची वर्दळ वाढल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरात अस्वच्छता वाढून सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.