मिरजेत थरार! BMW मधून दहशत माजवणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून गेम; तडीपार गुंडासह ५ जणांच्या मुसक्या आवळल्या!:, महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई 


मिरज: शहरातील शांतता भंग करून दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या एका खतरनाक टोळीचा मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन वर्षांसाठी तडीपार असलेला कुख्यात गुंड एजाज शेख याच्यासह त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एक आलीशान BMW कार आणि घातक कोयता जप्त करण्यात आला आहे. 

मिरज-कुपवाड रोडवर काही तरुण हत्यारांसह हैदोस घालण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी गांधी चौक परिसरात सापळा रचला. संशयित BMW (MH-04-EH-6327) येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी वेढले आणि आरोपींना पळून जाण्याची संधीच दिली नाही.
​तडीपार गुंडाचा उच्छाद संपवला!
पकडण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी इजाज ऊर्फ एजाज अल्फाज शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०२५ पासून त्याला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तरीही कायद्याला धाब्यावर बसवून तो शहरात शस्त्रे घेऊन फिरत असल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पोलिसांनी एजाज शेखसह सौरभ कोळेकर, शंकर फुले, बद्रुद्दीन दर्यावर्दी आणि समीर शेख यांना ताब्यात घेतले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे मिरज शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप शिंदे
​अभिजीत धनगर
​साक्षी पतंगे
​नानासाहेब चंदनशिवे
​विनोद चव्हाण
​जावेद शेख
​अमोल तोडकर
​मोसिन तिनमेकर
​राजेंद्र हारगे
​रामकृष्ण सुरवसे



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.