Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BREAKING: येरवडा जेलमध्ये सुरक्षेचे वाभाडे; तंबाखूवरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी, एक जखमी!

BREAKING: येरवडा जेलमध्ये सुरक्षेचे वाभाडे; तंबाखूवरून कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी, एक जखमी!


येरवडा, (पुणे) : येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे तंबाखू मागण्याच्या कारणावरून कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दोन कैद्यांनी एका कैद्याला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात जेवण वाढण्यासाठी वापरले जाणारे छोटे माप आणि प्लास्टिकची बादली मारल्याने कारागृहात एकच खळबळ उडाली. याबाबत वरिष्ठ कारागृह अधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून, दोन्ही आरोपी कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सर्कल क्रमांक दोनमधील बराकीजवळील स्वच्छतागृह परिसरात ही घटना घडली. संबंधित कैदी प्रसाधनगृहात जात असताना दोघांनी त्याला अडवून तंबाखूची मागणी केली. यावरून वाद वाढत गेला आणि संतापलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. 
कारागृहातील रक्षकांनी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मारहाण करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे करत आहेत.  दरम्यान, येरवडा कारागृहात कैद्यांमधील हाणामारी आणि गैरप्रकारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटना रोखण्यासाठी कारागृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरीही वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.