Breaking! काळजाचा थरकाप! डोळ्यात कचरा गेला अन् दुचाकी थेट विहिरीत कोसळली; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू, पती बचावला
कोल्हापूर : डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकी गेली थेट विहिरीत गेल्याने अपघातात एका महिलेच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी थेट विहिरीत कोसळल्याने विवाहितेचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. डोळ्यात कचरा जाऊन मोपेडवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. नियंत्रण सुटून मोपेड थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगावमध्ये ही घटना घडली आहे. मयुरी विशाल बेनके असं मृत विवाहितेच नाव आहे.
डोळ्यात अचानक गेलेल्या कचऱ्यामुळे...
मिळालेल्या माहितीनुसार, डोळ्यात अचानक गेलेल्या कचऱ्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्यानं काही क्षणात दुचाकी रस्त्याकडील विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत मयुरी विशाल बेनके (वय ३०) यांचा बुडून मृत्यू झाला तर पती विशाल बेनके थोडक्यात वाचले. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान हा अपघात घडला.
मयुरी यांची तब्येत ठीक नसल्याने गावातीलच डॉक्टरांकडे चालले
तर अपघातात मृत्यू झालेल्या मयुरी यांची तब्येत ठीक नसल्याने गावातीलच डॉक्टरांकडे स्वतः दुचाकीवरून पती विशाल यांना घेऊन जात होत्या. घरापासून अवघ्या तीनशे ते चारशे मीटर अंतरावरती मुख्य रस्त्यापासून २५ ते ३० फूट अंतरावरती विहीर आहे. या विहिरीजवळून जात असताना अचानक त्यांच्या डोळ्यात कचरा गेला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात दुचाकीसह दोघेही विहिरीत कोसळले.
अंधार, आणि पाण्याच्या खोलीमुळे शोध लागला नाही
रात्रीच्या अंधारात अचानक घडलेल्या परिस्थितीमध्येही विशाल यांनी पत्नीची शोधाशोध केली. मात्र अंधार, आणि पाण्याच्या खोलीमुळे शोध लागला नसल्याने विहिरीतून बाहेर येऊन घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नानंतर मयुरी बेनके यांचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठवला. मयुरी बेनके यांच्या पश्चात पती व दोन लहान मुली असा परिवार आहे. विशाल बेनके हे व्यावसायिक आहेत.
मुलगीही सोबत असती तर..
आईच्या निधनामुळे दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपल्याने गावभर हळहळ व्यक्त होत आहे. विहिरीमध्ये पाणी असल्याने घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही विहिरीमधून दुचाकी बाहेर काढता आली नव्हती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.