Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Big Breaking! सांगलीत गुन्हेगारांचे तांडव; भल्या पहाटे डोक्यात दगड घालून निर्घृण खून, पोलीस नेमके काय करतायत?​

Big Breaking! सांगलीत गुन्हेगारांचे तांडव; भल्या पहाटे डोक्यात दगड घालून निर्घृण खून, पोलीस नेमके काय करतायत?


सांगली :- सांगली शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल निर्माण करणारी अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना आज भल्या पहाटे समोर आली आहे. वसंतदादा साखर कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या बैल अड्डयावर एका ५५ वर्षीय इसमाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. राजेश बाबुराव घायतिडके (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत आणि अशा मोक्याच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे सांगली पोलिसांच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेश बाबुराव घायतिडके वय ( 55)हे नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास वसंतदादा कारखान्याच्या मागील बाजूच्या बैल अड्डा परिसरात आले असावेत. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आत हल्लेखोरांनी राजेश यांच्या डोक्यात अत्यंत निर्घृणपणे मोठा दगड घातला. हा हल्ला इतका भीषण होता की, राजेश यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सकाळी काही नागरिकांच्या निदर्शनास आला आणि परिसरात एकच खळबळ माजली.
पोलीस यंत्रणा हलली, मात्र कारण अद्याप गुलदस्त्यात!
​घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात एकच धावपळ उडाली. पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, संजयनगर पोलीस ठाण्याचे मुख्य निरीक्षक आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पथक तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.​
तपासासाठी ३ पथके रवाना

या हत्येचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तातडीने ३ विशेष पथके तयार केली असून ती वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

​सांगलीत कायदा-सुव्यवस्था रामभरोसे?
​या खुनाचे नेमके कारण काय? जुने वैर, आर्थिक वाद की अन्य काही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, भर शहरात पहाटेच्या सुमारास असा भीषण खून होतोच कसा? गुन्हेगारांना पोलिसांची भीती अजिबात उरलेली नाही का? असे अनेक तिखट सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारले जात आहेत. 'रात्रीची गस्त केवळ नावापुरतीच आहे का?' असा थेट आरोप नागरिक करत असून, पोलिसांनी केवळ पथके फिरवण्यापेक्षा गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. संजयनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान आता सांगली पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.