सांगली दर्पण Exclusive! मिरजेनंतर सांगलीतही 'उत्पादन शुल्क'चा गांधारी अवतार! 'सुरेश' अन् 'डायमंड'मध्ये किचनच गायब; कागदावरच्या हॉटेल्सना 'प्रवीण अण्णां'चाच वरदहस्त?
सांगली / मिरज: राज्य शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणारा सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या भ्रष्टाचाराच्या आणि संशयास्पद कारभाराच्या चिखलात पुरता रुतला आहे. मिरजेत कार्यालयाच्या नाकाखाली सुरू असलेल्या 'सुरेश परमिट रूम'चा काळा कारभार चव्हाट्यावर आलेला असतानाच, आता थेट सांगलीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या चांदणी चौक परिसरातील 'डायमंड परमिट रूम'नेही नियमांची अक्षरशः ऐशीतैशी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. परमिट रूमच्या नावाखाली चक्क बेकायदेशीर 'वाईन शॉप' थाटून ग्राहकांची आणि शासनाची लूट सुरू असताना, आता या दोन्ही हॉटेल्सचा आणखी एक अंगावर काटा आणणारा 'महाघोटाळा' उघडकीस आला आहे!
नकाशात 'किचन'चा थाट, प्रत्यक्षात मात्र...; नियमांची उघड होळी!
कायद्यानुसार कोणत्याही परमिट रूमला मंजुरी मिळण्यासाठी तिथे सुसज्ज 'किचन' (स्वयंपाकघर) असणे बंधनकारक आहे. कागदोपत्री मंजुरी मिळवताना सादर केलेल्या नकाशात या दोन्ही मालकांनी अलिशान किचन दाखवले आहे.
मात्र, प्रत्यक्षात 'सुरेश' आणि 'डायमंड' या दोन्ही परमिट रूममध्ये किचनचा सुगावाही नाही!
जर हॉटेलमध्ये अन्न शिजवण्यासाठी किचनच अस्तित्वात नाही, तर मग ग्राहकांना चकणा आणि खाद्यपदार्थ कुठून पुरवले जातात? की फक्त दारूची बेकायदेशीर विक्री करण्यासाठीच 'परमिट रूम'चा हा खोटा मुखवटा पांघरला आहे? किचन नसतानाही उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाकून या परमिट रूमला परवाने कसे दिले?
नियम वाकवण्यात तरबेज 'प्रवीण अण्णा'; 'डायमंड' अन् 'सुरेश'चा तोच सुत्रधार?
मिरज आणि सांगलीच्या या संपूर्ण काळ्याबेऱ्यात सध्या एकाच नावाचा डंका ऐकायला मिळतोय, तो म्हणजे पडद्यामागील सुत्रधार 'प्रवीण अण्णा'! शासकीय नियमांना केराची टोपली दाखवून, वाट्टेल तसे खोटे कायदेशीर 'प्रस्ताव' आणि 'नकाशे' तयार करण्यात आणि ते वरिष्ठ पातळीवरून मंजूर करून आणण्यात हे 'अण्णा' कमालीचे तरबेज असल्याचे बोलले जाते.मिरजेच्या 'सुरेश परमिट रूम' पाठोपाठ, सांगलीच्या 'डायमंड परमिट रूम'ला लाभलेल्या या अवैध मंजुरीमागे आणि गायब झालेल्या किचनच्या प्रकरणामागे याच प्रवीण अण्णांची कूटनीती आणि 'आर्थिक' कृपादृष्टी असल्याचा संशय आता बळावला आहे. या अण्णांचा वरदहस्त आणि आशीर्वाद असल्याशिवाय अधिकारी इतके आंधळे आणि मुके होऊच शकत नाहीत, अशी घणाघाती चर्चा आता व्यावसायिक वर्तुळात रंगली आहे.
प्रामाणिक व्यावसायिक कचाट्यात, 'डायमंड'सारखे काळे धंदे बोकाळले; कारवाई कधी?
एकही नियम न पाळता, विना-किचन बेकायदेशीरपणे परमिट रूम चालवून 'डायमंड' आणि 'सुरेश' सारखे चालक शासनाच्या अधिकृत महसुलाला दररोज लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. दुसरीकडे, प्रामाणिकपणे कर भरणारे आणि नियमांचे पालन करणारे व्यवसायिक मात्र किरकोळ त्रुटींसाठीही अधिकाऱ्यांच्या कचाट्यात अडकवले जातात. या दुजाभावामुळे प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप आहे.
नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांचा थेट इशारा:
"शहराच्या मध्यवर्ती भागात, चांदणी चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी 'डायमंड परमिट रूम'चा हा उघड बेकायदा प्रकार सुरू आहे. नकाशात किचन दाखवून प्रत्यक्षात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. जर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हा 'डायमंड' आणि 'सुरेश'चा काळा कारभार दिसत नसेल, तर मग हे अधिकारी नक्की कोणाचे खिसे भरण्यासाठी काम करत आहेत? जर 'डायमंड' आणि 'सुरेश'वर तात्काळ कडक कारवाई झाली नाही आणि त्या सूत्रधार 'प्रवीण अण्णा'चा बुरखा फाडला नाही, तर सांगली जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल!"आता या संपूर्ण रॅकेटवर सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी 'किचन घोटाळ्याची' चौकशी करून परवाने रद्द करणार? की 'प्रवीण अण्णा'च्या आर्थिक वजनाखाली दबून 'डायमंड' आणि 'सुरेश'ला पाठीशी घालणार? याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.