Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! सांगली सिव्हिलमध्ये खळबळ! '७७ नंबर'च्या 'त्या' टेबलसाठी 'तथाकथित बोक्याची' वरिष्ठांना १० लाखांची खुली ऑफर? ऑर्डर काढण्याची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात!

सांगली दर्पण Exclusive! सांगली सिव्हिलमध्ये खळबळ! '७७ नंबर'च्या 'त्या' टेबलसाठी 'तथाकथित बोक्याची' वरिष्ठांना १० लाखांची खुली ऑफर? ऑर्डर काढण्याची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात!


सांगली :- सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील रूम नंबर ७७ मधील कथित भ्रष्टाचाराचा, मनमानी कारभाराचा आणि लाचखोरीचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर येत आहे. गेल्या १३ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर आणि त्यातही प्रतिनियुक्तीवर एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या एका कर्मचाऱ्याची (ज्याचा सिव्हिल वर्तुळात 'बोका' म्हणून उल्लेख केला जात आहे) गुर्मी आता थेट वरिष्ठांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. आपले जुने आणि मलाईदार टेबल पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी या महाभागाने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तब्बल १० लाख रुपयांची खुली ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा विश्वासू सूत्रांनी केला होता. आता या प्रकरणात 'सांगली दर्पण'च्या हाती आणखी एक अत्यंत स्फोटक माहिती आली आहे.

​वरिष्ठांची लाळ घळघळली! 'बोक्याची' ऑर्डर काढण्याचे फर्मान जारी?
अतिशय खात्रीशीर आणि विश्वसनीय सूत्रांकडून 'सांगली दर्पण'ला मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पैशाच्या आमिषापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ या तथाकथित बोक्याच्या ऑफरला मूक संमतीच दर्शवली नाही, तर थेट त्याच्या नियुक्तीची ऑर्डर (आदेश) काढण्याचे कायदेशीर सोपस्कार आणि 'फार्मन' देखील वरिष्ठांनी अंतर्गत पातळीवर काढल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक माहितीमुळे सिव्हिल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नक्की प्रशासकीय नियमांनुसार कारभार चालतो की अशा लाचखोर प्रवृत्तींचा उघड उघड लिलाव मांडला जातो? असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.

​महिन्याची काळी कमाई किती? संशयाची सुई अधिक गडद!

फक्त एका टेबलवर पुन्हा नियुक्ती मिळवण्यासाठी जो कंत्राटी कर्मचारी थेट १० लाख रुपये रोख फेकण्याची तयारी दाखवतो आणि वरिष्ठही त्याचे गुलाम असल्यासारखे तातडीने ऑर्डर काढायला धावतात, यावरूनच या टेबलचे 'महात्म्य' काय आहे हे स्पष्ट होते. या कर्मचाऱ्याकडे एवढी अफाट मालमत्ता येते कुठून? जर एका टेबलची बोली १० लाख रुपये लावली जात असेल, तर या चर्चेतील 'बोक्याचा' महिन्याचा काळ्या कमाईचा आकडा नक्की किती हजारांच्या किंवा लाखांच्या घरात असेल? सरकारी यंत्रणेत कंत्राटी म्हणून प्रवेश करून, राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्ताने मलाईदार टेबल धरून वर्षानुवर्षे जनतेला लुटणे हाच या प्रवृत्तीचा धंदा बनल्याचा घणाघाती आरोप आता होत आहे.

​वरिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, संपूर्ण जिल्हा पेटून उठणार!
१३ वर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या या कर्मचाऱ्याला प्रशासकीय नियमांचा, बदलीचा किंवा कायदेशीर कारवाईचा कोणताही धाक उरलेला नाही. त्यातच आता वरिष्ठ पातळीवरूनही या १० लाखांच्या कथित ऑफरवर शिक्कामोर्तब करून त्याची ऑर्डर काढण्याची हालचाल सुरू झाल्याने, सिव्हिलमधील अंतर्गत यंत्रणा किती सडली आहे आणि भ्रष्टाचाराची वाळवी कुठपर्यंत पोहोचली आहे, हे उघड झाले आहे.

​पैसे फेको, मलाईदार टेबल मिळवा... हाच जर सिव्हिलचा कारभार असेल, तर गरिबांच्या आरोग्याचे काय? या कंत्राटी कर्मचाऱ्याची ही गुर्मी आणि लाचेच्या पैशापुढे लोटांगण घालणाऱ्या 'त्या' कथित भ्रष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन ही बेकायदेशीर ऑर्डर तातडीने रोखली जाणार का? की 'वरची' यंत्रणाही यात सामील आहे? याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 'सांगली दर्पण' या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.