Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली दर्पण Exclusive! पुण्यात १७ जणांचा बळी, तरीही 'उत्पादन शुल्क' आणि 'पालकमंत्री' गप्पच; सत्ताधाऱ्यांची संवेदना जळाली की खुर्ची उरली?

सांगली दर्पण Exclusive! पुण्यात १७ जणांचा बळी, तरीही 'उत्पादन शुल्क' आणि 'पालकमंत्री' गप्पच; सत्ताधाऱ्यांची संवेदना जळाली की खुर्ची उरली?


पुणे :- सांस्कृतिक आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विषारी दारूने तब्बल १७ जणांचा बळी घेतल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. १७ संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेले, मुले पोरकी झाली. परंतु, या एवढ्या मोठ्या नरसंहारानंतरही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांच्या तोंडून साधा सहानुभूतीचा शब्दही निघालेला नाही. या मंत्र्यांची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप जनतेसमोर आलेली नाही. त्यामुळे 'जनतेचे रक्षणकर्ते की केवळ खुर्चीचे भोके?' असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

​महिलांचा आक्रोश: 'दारूबंदी नका करू, पण आमच्या 
कुंकवावर तरी नियंत्रण ठेवा!'

​या घटनेनंतर पुणे परिसरातील महिलांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "आम्ही बिहार किंवा गुजरातसारखी पूर्ण दारूबंदी मागत नाही आहोत, कारण ती पूर्णपणे यशस्वी होत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. पण किमान या विषारी आणि अवैध दारूविक्रीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या संसारासाठी कठोर नियंत्रण तर ठेवा!" असा आर्त आणि आक्रमक टाहो स्थानिक महिलांनी फोडला आहे. जर राज्यात खुलेआम विषारी दारू विकली जात असेल, तर उत्पादन शुल्क विभाग नेमका काय करतोय? असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

​प्रशासकीय ढिसाळपणा आणि मंत्र्यांचे 'मौन'
​एकीकडे अवैध दारू धंद्यांवर कारवाईचे फुगे हवेत सोडले जातात, तर दुसरीकडे थेट १७ लोकांचा जीव जाईपर्यंत प्रशासन झोपलेले असते.

​उत्पादन शुल्क मंत्री कुठे आहेत? ज्या खात्याची जबाबदारी अवैध दारू रोखण्याची आहे, त्या खात्याच्या मंत्र्यांनी यावर चकार शब्दही काढलेला नाही.

​पालकमंत्री कुठे गायब? जिल्ह्याचे 'पालक' म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना या मृतकांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसायला वेळ मिळालेला नाही.

​जनतेचा थेट सवाल: जर जनतेच्या जिवाची किंमत शून्य असेल, तर या मंत्र्यांच्या दौऱ्यांवर आणि सुरक्षेवर जनतेच्या कराचा पैसा का उडवायचा?
​आता तरी जाग येणार का?

​पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या हफ्तेखोरीमुळेच हे अवैध धंदे फोफावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या १७ मृत्यूंना केवळ ती विषारी दारू जबाबदार नसून, प्रशासनाचा आणि मंत्र्यांचा निष्काळजीपणा तितकाच कारणीभूत आहे. आता या प्रकरणात केवळ छोटे-मोठे कर्मचारी निलंबित करून चालणार नाही, तर थेट मंत्र्यांनी समोर येऊन उत्तर दिले पाहिजे, अन्यथा जनतेचा हा संताप मंत्र्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा आता नागरिकांनी दिला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.