Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

FBI प्रमुख काश पटेल पुन्हा अडचणीत; सरकारी विमानाने गर्लफ्रेंडसोबत 'लक्झरी डेट' केल्याचा आरोप

FBI प्रमुख काश पटेल पुन्हा अडचणीत; सरकारी विमानाने गर्लफ्रेंडसोबत 'लक्झरी डेट' केल्याचा आरोप


अमेरिकन गुप्तचर संस्था FBI चे संचालक काश पटेल पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत दौऱ्याचे रूपांतर खासगी सहलीत करून आपल्या गर्लफ्रेंडला सरकारी खर्चाने लक्झरी ट्रिप घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे अमेरिकेत सरकारी संसाधनांच्या गैरवापराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, काश पटेल यांनी १० मे २०२५ रोजी आपली मैत्रीण अलेक्सिस विल्किन्स हिच्यासह FBI च्या ‘गल्फस्ट्रीम V’ या विशेष सरकारी विमानाने वॉशिंग्टनहून फिलाडेल्फियाला प्रवास केला. तिथे ते एका कंट्री म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे त्याच रात्री ते विमानाने परतले. या जोडप्याने जॉर्ज स्ट्रेट आणि ख्रिस स्टॅपल्टन यांचा कार्यक्रम एका खासगी सूटमधून पाहिला. या सूटचे भाडे अंदाजे ३५ ते ५० हजार डॉलर्स (सुमारे २९ ते ४२ लाख रुपये) इतके होते.
सुरक्षा रक्षकांचा ओव्हरटाइम

पटेल आणि विल्किन्स जोपर्यंत कार्यक्रमातून बाहेर पडत नाहीत, तोपर्यंत FBI चे विमान कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक रात्री ११ वाजेपर्यंत तिथेच थांबून होते. यासाठी त्यांना सरकारी तिजोरीतून ओव्हरटाइम भत्ताही देण्यात आला. दरम्यान, याआधीही काश पटेल यांच्यावर पर्ल हार्बर येथील स्मारकाजवळ व्हीआयपी पर्यटनाचा आनंद घेतल्याबद्दल टीका झाली होती. हे स्मारक १९४१ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.