Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतात Free WiFi चा धमाका! आता फक्त QR Code स्कॅन करा आणि मिळवा मोफत इंटरनेट

भारतात Free WiFi चा धमाका! आता फक्त QR Code स्कॅन करा आणि मिळवा मोफत इंटरनेट


आता QR Code स्कॅन केल्यावर लगेच इंटरनेट मिळेल. सरकारने PM-WANI योजनेची नवी रूपरेषा तयार केली आहे. यामुळे लोकांना रेल्वे स्टेशन, बस स्टॉप आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने WiFi वापरता येणार आहे.

आता फक्त QR Code स्कॅन करा
पहिल्यांदा PM-WANI WiFi जोडण्यासाठी लांबलचक पासवर्ड आणि लॉगिन प्रक्रिया करावी लागायची. आता ती पूर्णपणे बदलली आहे. नव्या प्रणालीत तुम्हाला फक्त स्मार्टफोनने स्क्रीनवर दिसणारा QR Code स्कॅन करायचा आहे. काही सेकंदातच इंटरनेट सुरू होईल. लॅपटॉप, टॅब्लेट किंवा इतर कोणत्याही उपकरणासाठीही ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. वेळ वाचेल आणि वापरकर्त्यांचा अनुभव खूप चांगला होईल.
15, 30 आणि 60 मिनिटांचे स्वस्त प्लॅन

लोकांच्या छोट्या-छोट्या गरजा लक्षात घेऊन सरकारने नवी कमी मुदतीचे प्लॅन सुरू केली आहे. आता तुम्हाला फक्त 15 मिनिटे, 30 मिनिटे किंवा 60 मिनिटांसाठी WiFi घेता येईल.रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ थांबलात, बसची वाट बघताय किंवा तातडीने काही माहिती हवी असेल तर हे प्लॅन खूप उपयुक्त ठरतील. कमी पैशात गरजेनुसार डेटा वापरण्याची सोय झाली आहे.

बनावट WiFi नेटवर्कपासून संरक्षण

सध्या सार्वजनिक ठिकाणी बनावट WiFi नेटवर्कमुळे अनेकांना फसवणूक होत होती. यावर आता सरकारने कडक पावले उचलली आहेत. सर्व अधिकृत PM-WANI नेटवर्कसमोर PMWANI ब्रँडिंग अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे लोकांना खरे नेटवर्क आणि बनावट नेटवर्क सहज ओळखता येईल. डेटा चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

देशभरात डिजिटल क्रांती
PM-WANI योजना ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांना परवडणारे इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. आता नव्या बदलांमुळे हा प्लॅन जास्त फास्ट , सुरक्षित आणि वापरायला सोपी झाली आहे. दूरसंचार विभागाचा हा प्रयत्न आहे की प्रत्येक नागरिकाला सहज इंटरनेट मिळावे. रेल्वे, बस स्टेशन, मार्केट आणि इतर सार्वजनिक जागी आता चांगल्या दर्जाचे WiFi मिळणे सोपे होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.