Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसही चक्रावले! जयंत पाटलांनी सांगितलेल्या 'मास्टरप्लॅन'मुळे इंधन दरात होणार मोठी कपात?

फडणवीसही चक्रावले! जयंत पाटलांनी सांगितलेल्या 'मास्टरप्लॅन'मुळे इंधन दरात होणार मोठी कपात?


विचार करा, जर उद्यापासून पेट्रोल आणि डिझेल थेट ७० ते ८० रुपये लिटरने मिळू लागलं तर? ऐकायला स्वप्न वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात शक्य असल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील  यांनी केला आहे.
सध्या महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून इंधनाचे भडकलेले दर सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहेत. त्यामुळेच जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिलं असून, राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असा दावा त्यांनी केलाय.

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आलाय, शिवाय खाद्यतेल आणि भाजीपाल्याचे दरही गगनाला भिडले आहेत. यातच मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढलंय. आजघडीला मुंबईत पेट्रोल १११.१२ रुपये तर डिझेल ९६.८६ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचलं आहे. या दरवाढीविरोधात जयंत पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, तातडीने सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केलीय.

यावर तोडगा काढताना जयंत पाटील म्हणतात की, राज्य सरकार सध्या पेट्रोलवर अंदाजे २५ टक्के व्हॅट आणि १०.१२ रुपये सरचार्ज लावतं. दुसरीकडे, डिझेलवर २४ टक्के व्हॅट आणि ३ रुपये सरचार्ज आकारला जातो. हाच व्हॅट आणि सरचार्ज जर राज्य शासनाने तातडीने रद्द केला, तर मोठा बदल घडू शकतो.
करांचा हा बोजा हटवल्यास आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल थेट ७०-८० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतं. कठीण आर्थिक परिस्थितीत सरकारने सकारात्मक विचार केल्यास केवळ वाहनचालकांनाच नाही, तर शेती, वाहतूक आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास जयंत पाटलांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.